For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

बॉलिवूडमध्ये पुनरागमन करणार नीलम

07:00 AM Mar 22, 2024 IST | Tarun Bharat Portal
बॉलिवूडमध्ये पुनरागमन करणार नीलम
Advertisement

20 वर्षांपर्यंत राहिली दूर

Advertisement

चित्रपटसृष्टीपासून सुमारे 20 वर्षे दूर राहिलेली नीलम कोठारी आता पुन्हा सक्रीय होत आहे. नीलमने आता ऑडिबलची ऑडिओ सीरिज ‘मार्वल्स : वुल्वरीन’मध्ये जीन ग्रे या व्यक्तिरेखेला आवाज दिला आहे. मी स्वत:च्या दागिन्यांच्या व्यवसायात रमले आहे. परंतु करण जौहरची वेबसीरिज ‘फॅबुलस लाइव्स ऑफ बॉलिवूड वाइव्स’ ही काहीशी हटके होते. याचमुळे यात सहभाग घेण्याचा विचार केल्याचे नीलम सांगते. सध्या तरी माझी प्राथमिकता व्यवसाय आणि माझी मुलगीच आहे. मुलगी सध्या 15 वर्षांची असून तिला खूप वेळ द्यावा लागतो. मी फॅबुलस लाइव्स ऑफ बॉलिवूड वाइव्सच्या तिसऱ्या सीझनमध्ये दिसून येणार आहे. याचबरोबर ही ऑडिओ सीरिज आहे. याचदरम्यान काही चांगल्या पटकथा आणि भूमिकांचा प्रस्ताव मिळाला तर मी विचार करेन असे नीलमने सांगितले आहे. 80 आणि 90 च्या दशकात आम्ही एकाच दिवसात 4 चित्रपटांचे चित्रिकरण करत होतो. आता लोक एकावेळी एकच चित्रपट किंवा प्रोजेक्टवर लक्ष देत आहेत. अशाप्रकारे आता काही चित्रपट तर केवळ 30-40 दिवसांमध्ये पूर्ण होत आहेत. हा मोठा बदल या क्षेत्रात घडला आहे. आता सेटवर पूर्णपणे नियोजनपूर्वक काम होते, असे वक्तव्य तिने केले आहे.

Advertisement
Advertisement
Tags :

.