For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

नील बॉईज हिंडलगा, अर्श इलेव्हन संघांचे विजय

10:49 AM May 09, 2025 IST | Tarun Bharat Portal
नील बॉईज हिंडलगा  अर्श इलेव्हन संघांचे विजय
Advertisement

डॉ. सतीश जारकीहोळी चषक टेनिसबॉल क्रिकेट स्पर्धा 

Advertisement

बेळगाव : वाल्मिकी जिल्हा संघटना व भातकांडे स्पोर्ट्स अकादमी यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ. सतीश जारकीहोळी चषक कर्नाटक राज्यस्तरीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत गुरुवारी खेळविण्यात आलेल्या सामन्यातून एसआरएस हिंदुस्थानने केआरएस मंगाई संघाचा, नील बॉईज हिंडलगाने रॉयल मराठा रामनगर व चॉईस इलेव्हन यमकनमर्डीचा, अर्श इलेव्हनने एसआरएस हिंदुस्थानचा व एवायसी अजमनगरचा पराभव करुन पुढील फेरीत प्रवेश मिळविला. तनिष्क नाईक, डॉमनिक फर्नांडीस, प्रशांत मुतगेकर, बाळकृष्ण यांना सामनावीर पुरस्कार देण्यात आला.

सरदार्स मैदानावर खेळविण्यात आलेल्या पहिल्या सामन्यात केआरएस मंगाईने प्रथम फलंदाजी करताना 8 षटकात 8 गडी बाद 67 धावा केल्या. त्यात बलधाराने 2 षटकार 1 चौकारासह 19, आदर्श हिरेमठने 1 षटकार 2 चौकारासह 18 धावा केल्या. एसआरएसतर्फे यशवंत व पुरुषोत्तम यांनी प्रत्येकी 2, अरुण कुमार व अहमद पाशा यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. प्रत्युत्तरादाखल खेळताना एसआरएस हिंदुस्थानने 7 षटकात 6 गडी बाद 71 धावा करुन सामना 4 गड्यांनी जिंकला. त्यात बालकृष्णने 6 षटकारासह 13 चेंडूत 40 तर श्रीनिवासने 12 धावा केल्या. मंगाईतर्फे शिवा मादारने 21 धावांत 3, सोनु मगेन्नावरने 16 धावांत 2 तर विनित उप्पीनने 1 गडी बाद केला.

Advertisement

दुसऱ्या सामन्यात रॉयल मराठा रामनगरने प्रथम फलंदाजी करताना 8 षटकात 9 गडी बाद 35 धावा केल्या. त्यात सुबोध कांबळेने 8 धावा केल्या. नील बॉईजतर्फे प्रशांत मुतगेकरने 3 धावांत 3, सुशांत कोवाडकरने 10 धावांत 2 तर तनिष्क नाईक व अनिकेत लोहार यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. प्रत्युत्तरादाखल खेळताना नील बॉईजने 2.5 षटकात 1 गडी बाद 36 धावा करुन सामना 9 गड्यांनी जिंकला. त्यात साकीब लंगोटीने 1 षटकार 3 चौकारासह 23, सुशांत कडोलकरने 11 धावा केल्या. रामनगरतर्फे प्रशांत गावडेने 1 गडी बाद केला.

तिसऱ्या सामन्यात अर्श संघाने प्रथम फलंदाजी करताना 8 षटकात 7 गडी बाद 84 धावा केल्या. समीर शेख व मुजकीर यांनी प्रत्येकी 18, सोहनने 10 धावा केल्या. एसआरएसतर्फे पुरुषोत्तमने 14 धावांत 3 तर अरुण व अहमद पाशाने यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. प्रत्युत्तरादाखल खेळताना एसआरएसने 8 षटकात 9 गडी बाद 66 धावा केल्या. त्यात मुरलीने 14, संदीप व अहमद पाशा यांनी प्रत्येकी 12 धावा केल्या. अर्शतर्फे डॉमनिक फर्नांडीसने 17 धावांत 4, कृष्णा चंदगडकर व अनुप मंजीलकरने प्रत्येकी 2 गडी बाद केले.

चौथ्या सामन्यात नील बॉईज हिंडलगाने प्रथम फलंदाजी करताना 8 षटकात 3 गडी बाद 102 धावा केल्या. प्रवीण काळेने 3 षटकार 1 चौकारासह 31, तनिष्क नाईकने 3 षटकार 1 चौकारासह 27 तर सुशांत कडोलकरने 3 चौकारांसह 25 धावा केल्या. यमकनमर्डीतर्फे तासिम ताटगारने 2, तर महांतेशने 1 गडी बाद केला. प्रत्युत्तरादाखल खेळताना चॉईस इलेव्हनने 8 षटकात 6 गडी बाद 58 धावा केल्या. त्यात चेतन करगुप्पीने 2 षटकार 2 चौकारासह 23 तर मारुतीने 12 धावा केल्या. नील बॉईजतर्फे शंकर होसमनी, तनिष्क नाईक व अनिकेत लोहार यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले.

पाचव्या सामन्यात अर्श संघाने प्रथम फलंदाजी करताना 8 षटकात 9 गडी बाद 91 धावा केल्या. समीर शेखने 2 षटकार 2 चौकारासह 21, अमित नाईकने 16 तर सोहन जी. व मुझकीर यांनी प्रत्येकी 14 धावा केल्या. एवायसी अजमनगरतर्फे फिरोज नालबंदने 18 धावांत 3, कपिल बाळेकुंद्री, फैयुम पिरजादे यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले. प्रत्युत्तरादाखल खेळताना अजमनगरने 8 षटकात 4 गडी बाद 66 धावा केल्या. त्यात कृष्णा नाईकने 18, अजिजने 14, अलिम माडीवालने 12, फिरोज नालबंदने 11 धावा केल्या. अर्शतर्फे अनु मंजीलकरने 2 तर डॉमनिक फर्नांडीसने 1 गडी बाद केला. सामन्यानंतर प्रमुख पाहुणे ए. एम. बेल्लद, रवी इटलंगी, ओमाण्णा कार्लेकर, राजशेखर तळवार, मिलिंद भातकांडे, सुरज तळवार, प्रशांत नाईक, मंजुनाथ दिग्गनट्टी, यल्लाप्पा कोप्पद, रवी बंगारप्पन्नावर, कृष्णा नाईक, रुपेश पावले, नासीर पठाण, अनवर द्राक्षी, बालेश दसलिंगनट्टी यांच्या हस्ते सामनावीर पुरस्कार देण्यात आले.

Advertisement
Tags :

.