For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement

भारताचे अनुकरण करण्याची गरज : विक्रमसिंघे

06:25 AM Mar 27, 2024 IST | Tarun Bharat Portal
भारताचे अनुकरण करण्याची गरज   विक्रमसिंघे

श्रीलंकेच्या राष्ट्रपतींकडुन कौतुक : पंतप्रधान मोदींचाही उल्लेख

Advertisement

वृत्तसंस्था/ कोलंबो

श्रीलंकेचे राष्ट्रपती रानिल विक्रमसिंघे यांनी भारताचे कौतुक केले आहे. आमचा देश भारताचे अनुकरण करत विकासाच्या दिशेने वाटचाल करू शकतो. तंत्रज्ञानाच्या स्तरावर आणि संस्थांना उभे करण्याप्रकरणी आम्हाला मदतीची गरज भासणार आहे. भारत याकरता सर्वोत्तम पर्याय असल्याचे मला वाटते. याकरता मागील वर्षी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी मी चर्चा केली होती. त्यांच्याकडून मला चांगला प्रतिसाद मिळाला आणि भारताकडून मदतही करण्यात आल्याचे विक्रमसिंघे यांनी सांगितले आहे.

Advertisement

भारत एक असा देश आहे, ज्याने शून्याचा आविष्कार केला आहे आणि मोठी वाटचाल करत आता प्रगती साध्य केली आहे. भारताने ज्याप्रकारे स्वत:ला सिद्ध केले आहे, ते अनुकरण करण्याजोगे आहे. भारताने डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चरप्रकरणी कमाल केली असून आम्ही त्याची नक्कल करत आहोत. निश्चितपणे आम्ही भारतासोबत वाटचाल करू इच्छितो असे विक्रमसिंघे म्हणाले.

Advertisement

रानिल विक्रमसिंघे यांनी मागील महिन्यातही भारताचे कौतुक केले होते. आर्थिक संकटाच्या स्थितीत श्रीलंकेला भारताकडून महत्त्वाची मदत मिळाली आहे. श्रीलंकेत 2022 मध्ये एक मोठे आर्थिक संकट उभे ठाकले होते. अशा स्थितीत भारताने श्रीलंकेच्या मदतीकरता धाव घेतली होती असे विक्रमसिंघे यांच्याकडून म्हटले गेले होते.

आम्ही भारताचे आभारी आहोत. भारताच्या मदतीशिवाय आम्ही तग धरू शकलो नसतो. आम्ही दोन्ही देशांदरम्यान घनिष्ठ संबंधांवरही विचार करत आहोत. आयआयटी मद्रासची एक शाखा श्रीलंकेतील कँडी येथे सुरू करण्याची आमची इच्छा असल्याचे त्यांनी नमूद केले होते.

Advertisement
×

.