For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

पोलिस आणि नागरिकांमध्ये विश्वासाचे वातावरण निर्माण होण्याची गरज : ऋषीकेश रावले

04:38 PM Jan 08, 2025 IST | अनुजा कुडतरकर
पोलिस आणि नागरिकांमध्ये विश्वासाचे वातावरण निर्माण होण्याची गरज   ऋषीकेश रावले
Advertisement

सावंतवाडी । प्रतिनिधी

Advertisement

“पोलिस आणि नागरिकांमधील अंतर कमी होणे आवश्यक आहे. हेच आपल्याला कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आणि आपत्तीग्रस्तांना मदतीची तत्परता वाढवण्यासाठी मदत करेल,” असे प्रतिपादन अप्पर पोलिस अधिक्षक श्री ऋषीकेश रावले यांनी आज सावंतवाडी येथे झालेल्या ‘रेझिंग डे’ कार्यक्रमात केले. व्यासपीठावर सावंतवाडी संस्थांनचे युवराज लखम राजे भोसले ,भोसले नॉलेज सिटीचे अच्युत सावंत, सावंतवाडी नगरपरिषद मुख्याधिकारी सागर साळुंखे पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण आदी उपस्थित होते .कार्यक्रमाचे उद्घाटन सावंतवाडी संस्थानचे युवराज श्री. लखमराजे भोसले यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी श्री. भोसले यांनी पोलिसांच्या कार्याचे कौतुक करत, “पोलिसांचे कार्य आपल्या समाजासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यांना जे काम दिले जाते, ते लोकांच्या हितासाठी असते. आपले कायदे आणि नियम पाळणे हे आपल्या सर्वांचा कर्तव्य आहे, आणि पोलिस हे आपल्या संरक्षणासाठी नेहमी तत्पर असतात,” असे सांगितले.तसेच, कार्यक्रमाचे आयोजन केलेल्या पद्धतीसाठी त्यांनी सर्व पोलिस अधिकाऱ्यांचे अभिनंदन केले. “तुम्ही पोलिसांबाबत असलेली भिती कमी करण्यासाठी असे उपक्रम घेत आहात, हे खूपच कौतुकास्पद आहे. या उपक्रमामुळे, नवा पिढी पोलिसांबद्दल चांगला दृषटिकोन स्वीकारेल आणि त्यांच्या कामाची महत्त्वता जाणून घेईल,” असे ते म्हणाले.

सिंधुदुर्ग जिल्हा पोलिसांच्या माध्यमातून आयोजित केलेल्या या कार्यक्रमाचा उद्देश पोलिस आणि सामान्य नागरिक यांच्यातील भिती व दुरावा कमी करणे आणि एक विश्वासपूर्ण वातावरण निर्माण करणे होता. रुषीकेश रावले यांनी सांगितले की, ज्या प्रकारे अनेक बाह्य देशांमध्ये पोलिस आणि नागरिक यांच्यात विश्वासाचं वातावरण आहे, तसेच आपल्या देशातही पोलिसांना एक आदर्श भूमिका मिळावी आणि नागरिक त्यांना सहकार्य करायला तयार असावेत, हे महत्त्वाचं आहे. रावले यांनी , “ज्या प्रमाणे विदेशांमध्ये पोलिस आणि सामान्य व्यक्ती यांच्यात भिती नाही, तेच आपल्याकडे देखील घडले पाहिजे. पोलिसांबद्दल असलेली भिती दूर करण्यासाठी पोलिसांनी स्वतः नागरिकांमध्ये विश्वास निर्माण करावा. पोलिस हे लोकांची सुरक्षा आणि संरक्षण करण्यासाठी काम करत आहेत, त्यामुळे पोलिसांकडून सन्मान मिळवणं हे नागरिकांसाठी महत्त्वाचे आहे,” असे सांगितले., रावले यांनी नागरिकांना अपघातग्रस्तांना मदत करण्याचे आवाहन केले. “जेव्हा आपण मदतीसाठी पुढे येतो, तेव्हा आपल्याला घाबरण्याची आवश्यकता नाही. पोलिसांसोबत काम करणे, त्यांच्याशी सहयोग साधणे, हेच आपल्या कर्तव्यात समाविष्ट आहे,” असे रावले यांनी सांगितले. त्यांच्या मते, एकमेकांवर विश्वास ठेवून काम केल्यासच समाजामध्ये कायदा व सुव्यवस्था राहू शकते.

Advertisement

विविध कार्यकमांची ओळख
कार्यक्रमात उपस्थित विद्यार्थ्यांसाठी पोलिस बँड पथकाने विविध गीते सादर केली. शस्त्र, श्वान पथक, सायबर गुन्हे आणि वाहतूक शाखेबाबत माहिती देणारे विविध स्टॉल्सही स्थापले गेले होते. यामुळे विद्यार्थ्यांना पोलिस विभागाच्या विविध विभागांची कार्यप्रणाली आणि त्यांचे महत्त्व समजून घेण्याची संधी मिळाली.विशेषत: सायबर गुन्हे आणि वाहतूक शाखेबाबत विद्यार्थ्यांना दिलेली माहिती अत्यंत उपयुक्त ठरली. पोलिस उपनिरीक्षक श्री. माधुरी मुळीक यांनी सायबर गुन्हे आणि त्यापासून वाचण्यासाठीच्या उपाययोजनांवर भाष्य करत, इंटरनेटच्या वापरावर सतर्क राहण्याचे आवाहन केलेयावेळी पोलिस निरीक्षक श्री. अमोल चव्हाण यांनी सांगितले की, “आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे की, आपण पोलिसांसोबत सहकार्य करावे. केवळ पोलिसांवर दबाव टाकण्याऐवजी, त्यांना मदतीसाठी पुढे यावं लागेल. पोलिस आणि नागरिकांमधील संवाद सुधारला, तर अनेक समस्यांचे समाधान सहज होऊ शकते.” पोलिसांसोबत काम करताना नागरिकांनी भिती न बाळगता, त्यांच्यावर विश्वास ठेवून काम करणे आवश्यक आहे. यामुळे स्थानिक पातळीवर कायदा व सुव्यवस्था अधिक प्रभावीपणे राखता येईल. यावेळी श्वान पथक बॉम्बशोधक पथक सायबर क्राईम भरोसा सेल सागरी सुरक्षा यासंदर्भात विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली

Advertisement
Tags :

.