For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement
Maharashtra Government – Diwali

ग्राम पंचायतींनी अधिक प्रभावीपणे कार्य करण्याची गरज

07:08 AM Nov 02, 2026 IST | Tarun Bharat Portal
ग्राम पंचायतींनी अधिक प्रभावीपणे कार्य करण्याची गरज
Advertisement

महांतेश कवटगीमठ;  ‘स्मार्ट व्हिलेज संकल्पना“ राष्ट्रीय परिषद 

Advertisement

त. भा. प्रतिनिधी

बेळगाव    :  ग्राम पंचायती या देशाची ताकद असून ग्राम पंचायत अध्यक्ष हे त्या गावातील मुख्यमंत्र्यांसारखे असतात. देशाच्या पंतप्रधानांनी केंद्राची कोणतीही योजना ठरवली, तर ती समाजातील शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचविणे ही ग्राम पंचायत अध्यक्षांची जबाबदारी आहे. पण दुर्दैवाने आज कर्नाटकात ग्राम पंचायत, तालुका पंचायत किंवा जिल्हा पंचायत अस्तित्वात नाही. तथापि, ग्राम पंचायतींनी समाजासाठी अधिक प्रभावीपणे कार्य करण्याची गरज आहे, असे विचार विधान परिषदेचे माजी मुख्य प्रतोद महांतेश कवटगीमठ यांनी व्यक्त केले.

Advertisement

प्रकृती ग्रुप आणि केएलई टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी शेषगिरी पॅम्पस, बेळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने ‘स्मार्ट व्हिलेज संकल्पना आणि शाश्वत ग्रामीण विकास“ या विषयावर दोन दिवसीय राष्ट्रीय परिषद 30 आणि 31 ऑक्टोबर रोजी विद्यापीठाच्या पॅम्पसमध्ये पार पडली. परिषद उद्घाटनप्रसंगी अध्यक्षस्थानावरून  कवटगीमठ बोलत होते.

विकसित भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी आत्मनिर्भर आणि आर्थिकदृष्ट्या उत्पादक गावे अत्यंत आवश्यक आहेत. भारत सरकार आणि राज्य सरकारच्या योजना गावातील शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचाव्यात, हीच सरकारची अपेक्षा आहे. स्वच्छ भारत अभियानांतर्गत ग्राम पंचायतींनी गावांमध्ये स्वच्छतागृहांचे बांधकाम आणि देखभाल, पिण्याचे पाणी, सामाजिक वनीकरण, सेंद्रिय शेती, ग्रंथालये, विशेषत: ई-ग्रंथालये यांसह सर्व बाबींमध्ये आपली जबाबदारी पार पाडणे आवश्यक आहे, असे ते म्हणाले.

केएलई टेक्नॉलॉजी युनिव्हर्सिटीचे प्राचार्य डॉ. एस. एफ. पाटील यांनी शाश्वत जीवनशैलीला चालना देण्यासाठी निसर्ग-आधारित उपाय आणि उदयोन्मुख तंत्रज्ञानाचे महत्त्व अधोरेखित केले. प्रकृती ग्रुपचे चेअरमन आणि सीईओ डॉ. पुरंदर बेकल यांनी परिषदेची उद्दिष्टे स्पष्ट केली. कृषी उत्पादकता, संसाधनांची कार्यक्षमता आणि ग्रामीण लवचिकता मजबूत करण्यासाठी पारंपरिक ज्ञान, तांत्रिक नवोपक्रम आणि डिजिटल परिवर्तन यांचा मेळ घालण्याकरिता अभियंते आणि शेतकऱ्यांनी एकत्र येण्याचे आवाहन केले.

परिषदेत कर्नाटक आणि आंध्र प्रदेशातील 115 प्रतिनिधी तसेच भारतीय अंतराळ संशोधन संस्था, ऊर्जा आणि संसाधन संस्था आणि राष्ट्रीय जलविज्ञान संस्थेचे तज्ञ उपस्थित होते.

Advertisement
Tags :

.