महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

म. ए. समिती बळकटीसाठी व्यापक कार्यकारिणीची गरज

11:00 AM Feb 05, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

कार्यकर्त्यांच्या बैठकीत निष्कर्ष : मतदारसंघनिहाय होणार स्थापना

Advertisement

बेळगाव : म. ए. समितीला बळकटी देण्यासाठी व्यापक व विभागवार कार्यकारिणीची आवश्यकता आहे. युवा कार्यकर्त्यांना सामावून घेऊन समितीला नवे बळ देण्याची गरज आज निर्माण झाली आहे. समितीकडे कार्यकर्ते आहेत. परंतु, त्यांच्याकडे जबाबदारी नसल्याने ते इतर पक्षांकडे वळत आहेत. त्यामुळे बेळगाव शहर व दक्षिण मतदारसंघनिहाय व्यापक कार्यकारिणी केली जाणार असून यामध्ये काम करू इच्छिणाऱ्यांनी आपली नावे विभाग समितीकडे द्यावीत. पुढील बैठकीत व्यापक कार्यकारिणीवर शिक्कामोर्तब करण्यात येणार असल्याचा निर्णय घेण्यात आला. बेळगाव दक्षिण व उत्तर मतदारसंघातील कार्यकर्त्यांची महत्त्वाची बैठक रविवारी मराठा मंदिर येथे पार पडली. या बैठकीत कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घेण्यात आल्या. सीमाप्रश्न ही एक चळवळ असून मागील 68 वर्षांपासून कार्यकर्त्यांच्या जोरावरच ती पुढे नेली जात आहे. या चळवळीला व्यापक स्वरुप देण्यासाठी प्रत्येक कार्यकर्त्याला जबाबदारी देणे महत्त्वाचे आहे. राष्ट्रीय पक्ष मराठी भाषिकांना आमिषे देऊन वळविण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे प्रत्येक विभागात म. ए. समिती बळकट होणे काळाची गरज असल्याचे मत व्यक्त केले. कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना रमाकांत कोंडुसकर म्हणाले, म. ए. समिती ही काही विभागांपुरतीच मर्यादित होती. यामध्ये सर्व कार्यकर्त्यांना सामावून घेण्याची मागणी अनेक दिवसांपासून होत होती. त्यानुसार कार्यकर्त्यांची मते आजमावली जात आहेत. यावेळी महादेव पाटील, रणजित चव्हाण-पाटील, नगरसेवक रवी साळुंखे, शिवाजी मंडोळकर उपस्थित होते. किरण धामणेकर, नितीन खन्नुकर, ज्ञानेश्वर मण्णूरकर, प्रशांत भातकांडे, मोतेश बारदेशकर, सागर पाटील, राजू पावले, दत्ता जाधव, सतीश पाटील, अनिल पाटील, अंकुश केसरकर, गणेश द•ाrकर यासह इतरांनी मते व्यक्त केली.

Advertisement

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article