For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Gadhinglaj Election Result | गडहिंग्लज तालुक्यात राष्ट्रवादीची सरशी ; भाजपचा धुव्वा

05:40 PM Feb 09, 2026 IST | NEETA POTDAR
gadhinglaj election result   गडहिंग्लज तालुक्यात राष्ट्रवादीची सरशी   भाजपचा धुव्वा
Advertisement

                                         गडहिंग्लज तालुक्यात राष्ट्रवादीची घवघवीत सरशी

Advertisement

गडहिंग्लज : गडहिंग्लज तालुक्यातील जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीचा निकाल जाहीर झाला. यामध्ये राष्ट्रवादीची सरशी झाली असून भाजपचा पूर्ण धुवा उडाल्याचे दिसून आले. जिल्हा परिषदेच्या पाच जागेपैकी चार जागेवर राष्ट्रवादीने विजय मिळवला असून एका जागेवर जनसुराज्यने झेंडा फडकवला आहे.

तर पंचायत समितीच्या १० जागेपैकी ८ जागेवर राष्ट्रवादीला यश मिळाले असून केवळ २ जागेवर भाजपला समाधान मानावे लागले. राष्ट्रवादीच्या नेत्या डॉ. नंदा बाभूळकर, माजी आमदार राजेश पाटील यांनी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र करत केलेल्या बेरजेला हे यश असल्याचे सांगितले जात आहे.

Advertisement

तर भाजपाचे आमदार शिवाजीराव पाटील यांना चंदगड तालुक्यातच मोठ्या चुरशीला सामना करावा लागत असल्याने त्यांचे गडहिंग्लजकडे झालेले दुर्लक्ष यामुळेच हे अपयश आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होत होती. राष्ट्रवादीचा एकजुटीने होत असलेला प्रचार आणि विस्कळीत झालेली भाजपा यामुळेच हा निकाल लागला असून जनसुराजने जिल्हा परिषद साठी गडहिंग्लजला खाते खोलले याचा धक्का साऱ्यांनाच बसला आहे. तर भाजपला चांगले यश मिळेल असा अंदाज गडहिंग्लजच्या मतदारांनी फोल ठरवला आहे. राष्ट्रवादीवर पुन्हा एकदा गडहिंग्लजच्या जनतेने विश्वास दाखवल्याचे या निकालावरून पहावयास मिळाले.

Advertisement
Tags :

.