For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

राष्ट्रवादीच्या सत्यवान साटेलकर यांचा शिवसेनेत प्रवेश

12:36 PM Apr 15, 2025 IST | अनुजा कुडतरकर
राष्ट्रवादीच्या सत्यवान साटेलकर यांचा शिवसेनेत प्रवेश
Advertisement

शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांनी केले स्वागत

Advertisement

वेंगुर्ले (वार्ताहर)-
शिवसेनेचे सर्वेसर्वा व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व राज्याचे माजी शालेय शिक्षण मंत्री तथा आमदार दिपक केसरकर यांच्या नेतृत्वाखाली वेंगुर्ले शहर राष्ट्रवादी (शरद पवार) काँग्रेसचे माजी शहर अध्यक्ष सत्यवान साटेलकर यांनी शनिवार दि. १२ एप्रिल रोजी शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला.वेंगुर्ले मारुती स्टॉप नजीकच्या सप्तसागर कॉम्प्लेक्स येथील शिवसेनेच्या तालुका मध्यवर्ती पश्न कार्यालयात शिवसेना जिल्हा प्रमुख संजू परब यांनी, शिवसेनेचे जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादी शरद पवार काँगेसचे शहर अध्यन सत्यवान साटेलकर यांचे शिवसेना पक्षात प्रवेश केल्याबद्दल पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.या प्रसंगी उपस्थित शिवसेना पदाधिकाऱ्यांत शहर प्रमुख उमेश येरम, तालुका प -मुख नितीन मांजरेकर, उपजिल्हा प्रमुख सुनिल मोरजकर, तालुका संघटक बाळा दळवी, तालुका कोस्टल विभाग तालुकाप्रमुख काशिनाथ नार्वेकर, युवा सेना जिल्हा प्रमुख हर्षद हेरे, युवा सेना तालुका प्रमुख स्वप्नील गावडे, कोचरा सरपंच योगेश तेली, आडेली विभाग प्रमुख मितेश परब, महिला उपजिल्हा आघाडी प्रमुख शितल साळगांवकर, महिला आघाडी तालुका आघाडी प्रमुख दिशा शेटकर, शहर महिला संघटक अँड श्रध्दा बावीस्कर परब, युवासेना शहरप्रमुख सागर गावडे, विभाग प्रमुख दत्ता साळगांवकर, पूजा सोनसुरकर, योगिता कडुलकर-धुरी, माजी शहर प्रमुख संतोष परब यासह शिवसेना कार्यकर्ते उपस्थित होते.

Advertisement
Advertisement
Tags :

.