महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

चिपळुणात राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी सामना रंगणार

11:09 AM Sep 20, 2024 IST | अनुजा कुडतरकर
Advertisement

शरद पवार २२ ला, अजित पवार उद्या चिपळुणात

Advertisement

चिपळूण / प्रतिनिधी 

Advertisement

राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार २२ सप्टेंबरपासून दोन दिवसांच्या चिपळूण दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यावर शरद पवार शेतकरी, मजूर, कामगार यांच्याशी संवाद साधणार आहेत. तर त्यांचे पुतणे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजित पवार यांची २१ रोजी चिपळुणात सायंकाळी ४ वाजता जाहीर सभा आहे. एकूणच आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 'पवार काका-पुतणे' यांनी कोकणातील चिपळूण-संगमेश्वर विधानसभा मतदारसंघावर विशेष लक्ष केंद्रित केल्याचे दिसते. दोन्ही राष्ट्रवादीकडून कोकणात विधानसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकण्यासाठी चिपळुण मतदारसंघाला पसंती देण्यात आली आहे. या मतदारसंघाचे विद्यमान आमदार राष्ट्रवादीचे शेखर निकम आहेत. जे सध्या अजित पवार गटात कार्यरत आहेत. त्यामुळे दोन्ही पवारांच्या चिपळूण दौऱ्याकडे राजकीय वर्तुळात विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

Advertisement
Tags :
# tarun bharat news # tarun bharat ratnagiri # tarun bharat official # ajit pawar # sharad pawar
Next Article