For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Miraj : मिरजेत प्रभाग ४ मध्ये राष्ट्रवादीचा झंझावात; विकासाचे व्हिजन घेऊन उमेदवार घरोघरी

01:52 PM Jan 08, 2026 IST | NEETA POTDAR
miraj   मिरजेत प्रभाग ४ मध्ये राष्ट्रवादीचा झंझावात  विकासाचे व्हिजन घेऊन उमेदवार घरोघरी
Advertisement

                       मिरज प्रभाग ४ मध्ये राष्ट्रवादी (अजित पवार)च्या प्रचाराला जोर

Advertisement

सांगली : सांगली–मिरज–कुपवाड महानगरपालिका निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर मिरजेतील प्रभाग क्रमांक ४ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाच्या प्रचाराने जोर पकडला आहे. पक्षाने या प्रभागात उमेदवार युवा उद्योजक शिशिर अण्णा जाधव, मिरज विद्या समितीचे अध्यक्ष शैलेशदादा देशपांडे, रेखाताई भगत आणि सिद्धीताई पिसे अशा सक्षम नेतृत्वाचे उमेदवार हे पॅनेल मैदानात उतरवले आहे. चारही उमेदवारांनी सामूहिक प्रचार दौरे, बैठका आणि घरोघरी मतदारांच्या भेटीगाठी सुरू ठेवल्या असून, त्यांना नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

भाजपचा प्रभाव मानल्या जाणाऱ्या या प्रभागात यंदा राष्ट्रवादीने विकासाच्या मुद्द्यावर लक्ष केंद्रीत करत जोरदार रणनीती आखली आहे. विरोधकांवर टीका–टिप्पणी करण्याऐवजी उमेदवारांनी विकासाचे स्पष्ट व्हिजन, सुशासन आणि लोकाभिमुख नेतृत्वाची भूमिका मतदारांसमोर मांडण्यास प्राधान्य दिले आहे. सुशिक्षित, अभ्यासू, संयमी आणि दूरदृष्टी असलेल्या या उमेदवारांनी निवडून आल्यानंतर प्रभाग ४ चा सर्वांगीण कायापालट करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.

Advertisement

सामान्य नागरिकांबरोबरच उच्चशिक्षित आणि विविध क्षेत्रातील मतदारांनीही राष्ट्रवादीच्या पॅनेलला प्रथम पसंती दिल्याचे चित्र प्रचारादरम्यान दिसून येत आहे. राष्ट्रवादीच्या वाढत्या जनसमर्थनामुळे भाजपच्या गोटात अस्वस्थता पसरली असून, प्रभाग ४ मध्ये परिवर्तनाची लाट निर्माण होत असल्याची चर्चा रंगली आहे. पक्षाच्या संघटित प्रचार यंत्रणेने, सक्षम नेतृत्वाच्या एकजुटीने आणि विकासकेंद्री भूमिकेमुळे राष्ट्रवादीचे चारही उमेदवार विजयाच्या दिशेने दमदार वाटचाल करीत आहेत.

Advertisement
Tags :

.