For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Ratnagiri News : शरद पवार राष्ट्रवादी पक्षातून अडरेकर यांची हकालपट्टी

11:47 AM May 31, 2026 IST | RAHUL SADOLIKAR
ratnagiri news   शरद पवार राष्ट्रवादी पक्षातून अडरेकर यांची हकालपट्टी
Advertisement

चिपळूण : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) पक्षाच्या चिपळूण तालुका कार्यकारिणीतील पदाधिकारी मुराद अडरेकर यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. पक्षविरोधी भूमिका घेणे तसेच पक्षाच्या विचारसरणीला बाधा पोहोचवणारे वर्तन केल्याचा ठपका ठेवत जिल्हा निरीक्षक विजय देसाई यांच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आल्याची माहिती पक्षाच्यावतीने प्रसिद्धीपत्रकाद्वारे देण्यात आली. 

Advertisement

पक्षाच्या अधिकृत भूमिकेविरोधात जाऊन काम करणाऱ्या कोणत्याही पदाधिकाऱ्याला किंवा कार्यकर्त्याला पक्षात स्थान दिले जाणार नाही, असा संदेश या कारवाईतून देण्यात आल्याचे पक्षाने म्हटले आहे. दरम्यान, पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी तसेच सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी सातत्याने कार्यरत राहाणार असल्याचा पुनरुच्चार पक्षाच्यावतीने करण्यात आला.

ही कारवाई रत्नागिरी जिल्हा पक्ष संघटनेच्या स्तरावर करण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) चिपळूण तालुका कार्यकारिणीतून हकालपट्टी करण्यात आल्याच्या पार्श्वभूमीवर मुराद अडरेकर यांनी पक्ष निरीक्षक विजय देसाई यांच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

Advertisement

पक्ष निरीक्षकांना कोणत्याही पदाधिकाऱ्याची किंवा सदस्याची हकालपट्टी करण्याचा अधिकार नसून, ही कारवाई पक्ष घटनेच्या विरोधात असल्याचा दावा त्यांनी केला आहे. पक्षाची घटना आणि नियम न अभ्यासता कारवाई करण्यात आली आहे. कारवाई करण्याचा अधिकार संबंधित पक्ष संघटना, जिल्हाध्यक्ष किंवा शिस्तभंग समितीकडे असतो. त्यामुळे निरीक्षकांनी केलेली हकालपट्टीची घोषणा वैध नसल्याचा दावा त्यांनी केला आहे.

Advertisement
Tags :

.