महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

फळबागायतदार संघटना , राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली गोवा कृषिमंत्र्यांची भेट

11:55 AM Jul 03, 2024 IST | अनुजा कुडतरकर
Advertisement

सावंतवाडी । प्रतिनिधी

Advertisement

गोवा राज्याचे कृषिमंत्री रवी नाईक यांची शेतकरी आणि फळबागायतदार संघ सावंतवाडी व दोडामार्ग या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या सह पर्वरी येथील मंत्रालयांमध्ये नियोजित भेट घेउन  महाराष्ट्रातील काजू उत्पादनाला शेतकऱ्याला  योग्य भाव मिळावा या दृष्टीने  कृषिमंत्र्यांचे मार्गदर्शन घेतलेआहे.गोवा राज्यामध्ये काजू बियाणाला प्रति किलो 150 रुपये भाव सध्या शेतकऱ्यांना देण्याची शासकीय योजना कृषी मंत्रालयामार्फत गोव्यात सुरू आहे. यापुढे जाऊन गोवा राज्य कृषी मंत्रालय प्रति किलो 170 भाव काजू उत्पादकाला मिळावा या दृष्टीने प्रस्ताव आता होणाऱ्या गोवा राज्य  अधिवेशनामध्ये मांडला जाईल व त्याला मंजुरी मिळेल असे कळते. गोवा राज्यात एवढा चांगला दर काजू उत्पादकाला मिळत असेल तर मग महाराष्ट्रात तसाच दर मिळावा यासाठी लवकरच महाराष्ट्र राज्याचे कृषिमंत्री माननीय धनंजय मुंडे व पणन मंत्री अब्दुल सत्तार यांची मुंबई येथे या अधिवेशनामध्ये भेट घेऊन काजू उत्पादक शेतकऱ्याला योग्य भाव मिळावा यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत, असे शेतकरी संघटनेचे अध्यक्ष श्री विलास सावंत यांनी स्पष्ट केले आहे.यावेळी माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले सौ. अर्चनाताई घारे परब अध्यक्ष महिला राष्ट्रवादी काँग्रेस , विलास सावंत अध्यक्ष सावंतवाडी दोडामार्ग शेतकरी संघटना, गोवा राज्य कृषी सचिव मंदार शिरोडकर, कृषी संचालक  संदीप फळ देसाई, शेतकरी संघटनेचे पदाधिकारी  दिवाकर म्हावळणकर, खजिनदार, अशोक सावंत उपाध्यक्ष दोडामार्ग शेतकरी, आकाश नरसूले, संजय देसाई अध्यक्ष दोडामार्ग शेतकरी संघ, पुंडलिक दळवी तालुकाध्यक्ष सावंतवाडी, योगेश कुबल तालुकाध्यक्ष वेंगुर्ला, विवेक गवस विधानसभा युवक अध्यक्ष, ऋतिक परब विद्यार्थी अध्यक्ष, मनोज वाघमोरे आदि उपस्थित होत . दरम्यान केंद्र सरकारने काजू वरील आयात शुल्क पाच टक्के वरून अडीच टक्केवर केले त्यामुळे परदेशातील काजू भारतात मोठ्या प्रमाणात आयात झाला. त्यामुळे स्थानिक काजूचे दर पडले .आता कोकणातील जनतेने नारायण राणे यांना पुन्हा निवडून दिले आहे. त्यामुळे नारायण राणे यांनी केंद्राकडे पाठपुरावा करून परदेशी काजूचे आयात शुल्क पाच टक्के पेक्षा अधिक करावे आणि येथील काजू उत्पादक शेतकऱ्यांना न्याय द्यावा अशी मागणी माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले यांनी केले आहे

Advertisement

Advertisement
Tags :
#tarun bharat news update # sindhudurg # ncp # goa #
Next Article