राष्ट्रवादी (शरद पवार) गटाचे नेते महेश कोठे यांचा कुंभमेळाव्यात मृत्यू
सोलापूर
सोलापूरचे माजी महापौर आणि राष्ट्रवादी (शरद पवार) गटाचे नेते महेश कोठे यांचे महाकुंभ मेळाव्यात मृत्यू झाला. कोठे यांचे महाकुंभ मेळाव्यातील शाही स्नानानंतर थंडीमुळे ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. महेश कोठे यांच्या अकाली निधनानंतर राजकिय वर्तुळातून हळहळ व्यक्त होत आहे.
महेश कओठे हे सोलापूर राष्ट्रवादी (शरद पवार) गटाचे नेते आणि सोलापूर महानगरपालिकेचे माजी महापौर होते. महेश कोठे आणि त्यांचे वडील विष्णुपंत कोठे हे माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांचे निकटवर्तीय विश्वासू म्हणून ओळखले जात होते.
मिळालेल्या माहितीनुसार, शाही स्नाननंतर थंडीमध्ये रक्त गोठल्याने त्यांना ह्रदय विकाराचा झटका आला, कोठे हे कुटुंबिय व मित्र परिवारासमवेत महाकुंभ मेळाव्यात सहभागी होण्यासाठी गेले होते. शाही स्नानानंतर ह्रदय विकाराचा झटका आला. दरम्यान उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला.