For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Satara News : बारामतीत राष्ट्रवादीच्या नगरसेवकाविरुद्ध विनयभंग व मारहाणीचा गुन्हा दाखल

12:35 PM Jun 01, 2026 IST | RAHUL SADOLIKAR
satara news   बारामतीत राष्ट्रवादीच्या नगरसेवकाविरुद्ध विनयभंग व मारहाणीचा गुन्हा दाखल
Advertisement

बारामती : विधवा असल्याचा गैरफायदा घेत एका महिलेचा गेल्या साडेचार महिन्यांपासून सातत्याने शरिरसुखाची मागणी करीत छळ व ब्लॅकमेलींग केल्याप्रकरणी राष्ट्र बादी काँग्रेस पक्षाचे बारामती नगरपरिषदेचे विद्यमान नगरसेवक किशोर आप्पासाहेब मासाळ (रा. सुर्यनगरी जळोची) याच्याविरुद्ध तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

Advertisement

याप्रकरणी शहरातील एमआयडीसी भागातील महिलेने फिर्याद दाखल केली आहे. १३ फेब्रुवारी २०२६ ते २५ मे २०२६ या कालावधीत ही घटना घडली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. फिर्यादात नमूद केल्यानुसार फिर्यादीची मासाळ याच्याशी ओळख होती. तिचे पती मयत्त झाल्यानंतर ती विधवा असल्याने तिचा गैरफायदा घेत त्याने वेळोवेळी तिच्या राहत्या घरात जबरदस्तीने प्रवेश करीत तिच्याकडे शरिरसुखाची मागणी केली.

तिच्या अंगाशी लगट करून तिच्या मनाला लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले. तसेच मी स्थानिक नेता आहे, तुला इथे सुखाने जगू देणार नाही. माझ्या खूप ओळखी आहेत. तुम्हाला इथे सुखाने जगू देणार नाही. तुम्हाला नको नको करून ठेवीन. खोट्या गुन्ह्यात अडकवीन. तुझे फोटो माझ्या मोबाईलमध्ये आहेत. तु मी सांगेल तसे ऐक, असे म्हणत मासाळणे तिच्याकडे वेळोवेळी शरीर सुखाची मागणी केली.

Advertisement

तसेच तू बारामती येथील उद्योजकांना ब्लॅकमेल करून त्यांच्याकडून मला पैसे काढून दे, नाहीतर तुझे फोटो सोशल मीडियावर पाठवून तुझी बदनामी करेल, अशी धमकी दिली तिचा वेळोवेळी पाठलाग केला तसेच तिला हाताने लाथा बुक्क्यांनी मारहाण केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या फिर्यादीमुळे बारामतीत मोठी खळबळ उडाली आहे. 

Advertisement
Tags :

.