For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहराध्यक्ष ॲड. सायली दुभाषी शिंदे शिवसेनेत

05:12 PM Oct 14, 2025 IST | अनुजा कुडतरकर
राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहराध्यक्ष ॲड  सायली दुभाषी शिंदे शिवसेनेत
Advertisement

संजू परब यांच्या नेतृत्वाखाली पक्षप्रवेश

Advertisement

सावंतवाडी । प्रतिनिधी

आगामी सावंतवाडी नगरपरिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख संजू परब यांनी सावंतवाडीत मोठी राजकीय खेळी करित राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरदचंद्र पवार गटाला धक्का दिला आहे त्यांच्या प्रभावी नेतृत्वावर विश्वास ठेवत राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या महिला शहराध्यक्ष ॲड. सायली दुभाषी यांच्यासह पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते शिंदे शिवसेनेत सामील झाले.शिवसेना जिल्हाप्रमुख व माजी नगराध्यक्ष संजू परब यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरदचंद्र पवार गटाच्या महिला आणि अल्पसंख्याक नेतृत्वाचा मोठा सहभाग आहेसावंतवाडी शहरातील झिरंगवाडी भागातून झालेल्या या प्रवेशाचे वैशिष्ट्य म्हणजे राष्ट्रवादीच्या ॲड. सायली दुभाषी यांच्यासोबतच राष्ट्रवादीच्या अल्पसंख्यांक शहराध्यक्ष ॲड. राबिया शेख आणि अल्पसंख्यांक शहर अध्यक्ष झहूर खान यांच्यासह अल्पसंख्यांक समाजातील अनेक महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटात प्रवेश केला.जिल्हाप्रमुख संजू परब यांच्या मितभाषी वाणी, सातत्यपूर्ण सहकार्य आणि माणुसकी जपणारा व्यक्तिमत्त्व या कौशल्यामुळे कार्यकर्ते आकर्षित होत असल्याचे यावेळी दिसून आले.प्रवेश केलेल्या प्रमुख पदाधिकाऱ्यामध्येॲड. सायली दुभाषी, ॲड. राबिया शेख, झहूर खान, इलियास आगा, तौसिफ आगा, सोहेल शेख, फिरोज खान, आरिफ खान, शौकत बेग, अनिस शेख, अझहर रेशमी, रियाज अत्तार, रमजान नाईकवाडी, वाजीद खान, शहाबाद आगा, मंगेश घाडीगावकर, पापा ऐन्नी, रुकसाना खान, काशिनाथ दुभाषी, साजिदा फिरोज खान, श्रावणी श्रीकांत कोरगावकर, श्रीकांत कोरगावकर, गणेश निंबाळकर, सिद्धी नागेश निंबाळकर, तैमीन तहसीलदार, फिरदोस जहूर खान, नंदिनी वेंगुर्लेकर, अलका अर्जुन नाईक, महेक महंमद खान, शहनाज आरिफ खान, अमृता अनिल नाईक, सकीना वाजिद खान, फातिमा अहमद खान, जिलेखा आयुब खान, नुसरत असिफ खान, रिदा अझहर रेशमी, हसीना पापा ऐन्नी, फरदीन शेख, वाहिदा शौकत बेग, झेबा नाईक, अनुष्का मातोंडकर, शेवंती घाडीगावकर, फैजा खान यांसह शेकडो कार्यकर्ते व महिलांनी यावेळी शिंदे गटाचा भगवा हाती घेतला.यावेळी शहराध्यक्ष बाबू कुडतरकर, सचिव परीक्षित मांजरेकर, युवा सेनेचे शहराध्यक्ष अर्चित पोकळे, कोलगाव शाखाप्रमुख गौरव कुडाळकर, समीर पालव यांसह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. या मोठ्या पक्षप्रवेशामुळे सावंतवाडीतील शिंदे गटाची ताकद वाढली असून, आगामी निवडणुकांमध्ये या भरतीचा मोठा परिणाम दिसून येण्याची शक्यता आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.