For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

अजितदादांच्या जाण्याने कार्यकर्त्यांचा आधारवड हरपला

05:00 PM Jan 28, 2026 IST | अनुजा कुडतरकर
अजितदादांच्या जाण्याने कार्यकर्त्यांचा आधारवड हरपला
Oplus_131072
Advertisement

राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानसभा अध्यक्ष उमाकांत वारंग यांची प्रतिक्रिया

Advertisement

सावंतवाडी : प्रतिनिधी

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आकस्मिक निधनाने महाराष्ट्राचे आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचे मोठे नुकसान झाले आहे. अजित पवार यांचा कार्यकर्त्यांना मोठा आधार होता. ते कार्यकर्त्यांना कुटुंबातील सदस्याप्रमाणे वागणूक देत असत. त्यांच्या निधनाने कार्यकर्त्यांचे मोठे नुकसान झाले आहे अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे सावंतवाडी विधानसभा अध्यक्ष उमाकांत वारंग यांनी अजित पवार यांना श्रद्धांजली वाहिली अजित पवार हे धडाडीचे नेते होते.जनहिताची कामे ते तात्काळ मार्गी लावत असत.सामान्य कार्यकर्ता त्यांच्याकडे विकासाचे काम घेऊन गेल्यानंतर ते लगेच मार्गी लावत असत.कार्यकर्त्यांना ते सहजपणे उपलब्ध होत असत.त्यामुळे कार्यकर्त्यांना ते आपलेसे वाटत असत. अजित पवार यांच्या जाण्याने सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा आधारवड हरपला आहे. त्यांच्या निधनाने महाराष्ट्राचे मोठे नुकसान झाले आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.