सिंधुदुर्ग महाविद्यालयात एनसीसी डे साजरा
मालवण । प्रतिनिधी
सिंधुदुर्ग महाविद्यालयाच्या एनसीसी विभागामार्फत आज एनसीसी डे साजरा करण्यात आला. सुरुवातीला ईशस्तवन म्हणत कॉलेजचे प्राचार्य शिवराम ठाकूर यांच्या हस्ते एनसीसी झेंडावंदन करण्यात आले. झेंडावंदन झाल्यानंतर प्राचार्य शिवराम ठाकूर यांनी एनसीसी दिनानिमित्त सर्व एनसीसी आणि इतर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले . यामध्ये एनसीसी चे महत्व काय आहे, आपल्या कॉलेजची एनसीसी जिल्ह्यात व इतर जिल्ह्यांमध्ये कशाप्रकारे नावाजली गेली यासंबंधी माहिती त्यांनी दिली, एनसीसी घेऊन कोणकोणत्या संधी निर्माण होऊ शकतात याचाही उहापोह त्यांनी केला.
भाषणानंतर एनसीसी घेऊन जे विद्यार्थी आत्ताच सरकारी नोकरीमध्ये लागलेले आहेत त्यातील माजी एनसीसी विद्यार्थी स्नेहल ढोके ही मालवण तहसील मध्ये महसूल सेवक म्हणून नोकरीला लागलेली आहे. त्याचबरोबर एनसीसी कॅडेट करण मांजरेकर हा सहाय्यक म्हणून लागलेला आहे त्याचबरोबर , एनसीसी कॅडेट राहुल चव्हाण महसूल सेवक म्हणून काम करीत आहे अशा या शासकीय नोकरीत असणाऱ्या एनसीसी कॅडेटचा सत्कार यावेळी प्राचार्यांच्या हस्ते करण्यात आला.
याच वेळी बांबू हॉटेलचे मालक संजय गावडे यांनी जे विद्यार्थी काम करून शिक्षण घेत आहेत. दिवस-रात्र मेहनत करतात अशा कष्टाळू एनसीसी विद्यार्थिनींना दोन सायकली बक्षीस दिल्या त्याचेही वितरण प्राचार्य व संजय गावडे यांच्या हस्ते करण्यात आले. संजय गावडे यांनी सुद्धा आपल्या भाषणातून जे विद्यार्थी घरचा खर्च भागवण्यासाठी मिळेल ते काम करून शिक्षण घेत असतात अशा विद्यार्थ्यांचा सन्मान करणे गरजेचे आहे आणि या दृष्टीने मी या ठिकाणी हा सन्मान करीत आहेअसे आपल्या भाषणातून व्यक्त केले.त्याचबरोबर फुग्यांच्या माध्यमातून एनसीसी लोगो तयार करण्यात आला. एनसीसी डे असल्यामुळे एनसीसी नावाचा केक कापण्यात आला. असे विविध उपक्रम एनसीसी डे निमित्त राबवण्यात आले.
यानंतर एनसीसी गीत म्हणण्यात आले आणि कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला या कार्यक्रमाचे कमांडिंग सीनियर मनाली पालव या विद्यार्थिनीने केले. त्याचबरोबर ट्रूप कमांडर कमांडिंग सीनियर राहुल जाधव, सिद्धी मराठे, वैभव पाताडे , दर्पणा जाधव या सीनियरनी केले. तर संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन, सूत्रसंचालन , आणि आभार प्रदर्शन लेफ्टनंट प्रा डॉ एम आर खोत यांनी केले. यावेळी कॉलेजचे सर्व प्राध्यापक ,ऑफिस स्टाफ ,एनसीसीचे सर्व विद्यार्थी कॉलेजचे इतर विद्यार्थी, रामभाऊ परुळेकर कनिष्ठ महाविद्यालयाचे सर्व विद्यार्थी आणि सर्व प्राध्यापक वर्ग उपस्थित होता.