For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

एनसी 51, काँग्रेस 32 जागा लढविणार

06:45 AM Aug 27, 2024 IST | Tarun Bharat Portal
एनसी 51  काँग्रेस 32 जागा लढविणार
Advertisement

जम्मू-काश्मीर निवडणुकीसाठी जागावाटप जाहीर 

Advertisement

वृत्तसंस्था/ श्रीनगर

जम्मू-काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेस आघाडी अंतर्गत विधानसभा निवडणूक लढविणार आहे. आघाडीच्या अंतर्गत दोन्ही पक्षांमध्ये जागावाटपावर सहमती झाली आहे. दोन्ही पक्ष एकूण 85 जागांवर उमेदवार उभे करणार असून याच्या अंतर्गत फारुख अब्दुल्लांचा एनसी 51 तर काँग्रेस 32 जागांवर निवडणूक लढविणार आहे. तर माकप आणि पँथर्स पार्टीकरता प्रत्येकी एक जागा सोडण्यात येणार आहे.

Advertisement

जम्मू-काश्मीरमध्ये जागावाटपासाठी काँग्रेससोबतची चर्चा पूर्ण झाली आहे. 90 पैकी 51 जागा काँग्रेस तर काँग्रेस 32 जागा लढविणार आहे. तर 5 जागा मित्रपक्षांसाठी सोडण्यात येतील. एक जागा माकप आणि एक पँथर्स पार्टीसाठी सोडली जाईल अशी माहिती एनसी अध्यक्ष फारुख अब्दुल्ला यांनी सोमवारी दिली आहे.

इंडिया आघाडीचा मुख्य उद्देश जम्मू-काश्मीरला वाचविणे होता. याचमुळे एनसी-काँग्रेस हे जम्मू-काश्मीरमध्ये आघाडीचे सरकार स्थापन करण्यासाठी तयार आहेत. आम्ही एकत्र लढू, जिंकू आणि आम्ही जम्मू-काश्मीरमध्ये सरकार स्थापन करू असे उद्गार काँग्रेसचे महासचिव के. सी. वेणुगोपाल यांनी काढले आहेत.

जम्मू-काश्मीरमध्ये 10 वर्षांनी विधानसभा निवडणूक होणार आहे. कलम 370 हद्दपार झाल्यावर जम्मू-काश्मीरला केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा देण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर पहिल्यांदाच तेथे विधानसभा निवडणूक होणार आहे. केंद्रशासित प्रदेशात तीन टप्प्यांमध्ये निवडणूक होणार आहे. जम्मू-काश्मीरमधील 90 विधानसभा मतदारसंघांसाठी 18 सप्टेंबर, 25 सप्टेंबर आणि 1 ऑक्टोबर रोजी मतदान होणार आहे. तर 4 ऑक्टोबर रोजी निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे.

Advertisement
Tags :

.