For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सिंधूकन्या नयोमी साटम यांची सिंधुदुर्ग अप्पर पोलीस अधीक्षक पदी नियुक्ती

04:51 PM Jul 08, 2025 IST | अनुजा कुडतरकर
सिंधूकन्या नयोमी साटम यांची सिंधुदुर्ग अप्पर पोलीस अधीक्षक पदी नियुक्ती
Advertisement

कणकवली / प्रतिनिधी

Advertisement

सिंधुदुर्गच्या अप्पर पोलीस अधीक्षक पदी नयोमी दशरथ साटम यांची नियुक्ती झाली आहे. साटम या मूळ कणकवली तालुक्यातील पिसेकामते -फळसेवाडी येथील असून त्यांचे कुटुंबीय मुंबई येथे वास्तव्याला असते. सहाय्यक पोलीस अधीक्षक चंद्रपूर येथून त्यांची सिंधुदुर्ग येथे बदली झाली आहे. नयोमी यांचे मूळ गाव पिसेकामते फळसेवाडी असले तरीही त्यांचे प्राथमिक शिक्षण दहिसर मुंबई येथे झाले. सेंट जेवियर कॉलेजमधून इकॉनॉमिक्स या विषयातून 2019 मध्ये त्यांनी पदवी संपादन केली. पदवी संपादन करतानाच त्यांनी यूपीएससीची परीक्षा देण्याचे निश्चित केले होते. पदवीधर होताच त्यांनी बेंगलोर येथे यूपीएससीसाठी क्लास जॉईन केला. त्यावेळी कोरोनामुळे त्यांना क्लास सोडून पुन्हा मुंबईला परतावे लागले होते. मात्र त्याही परिस्थितीत त्यांनी अभ्यासक्रम पूर्ण करत 2020 मध्ये त्यांनी पहिल्यांदाच यूपीएससी परीक्षा दिली त्या परीक्षेत त्या 162 व्या क्रमांकाने उत्तीर्ण झाल्या होत्या. सिंधू कन्येची सिंधुदुर्गच्या अप्पर पोलीस अधीक्षक पदी नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

Advertisement
Advertisement
Tags :

.