4 एप्रिलला झळकणार नयनताराचा ‘टेस्ट’
आर. माधवनही मुख्य भूमिकेत
आर. माधवन आणि नयनतारा यांचा आगामी चित्रपट ‘टेस्ट’ ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे. निर्मात्यांनी याच्या स्ट्रीमिंगची तारीख जाहीर केली आहे. हा एक स्पोर्ट्स ड्रामा धाटणीचा चित्रपट आहे. एस. शशिकांत यांच्या दिग्दर्शनातील हा चित्रपट 4 एप्रिल रोजी ओटीटीवर झळकणार आहे. शशिकांत यांनी यापूर्वी लोकप्रिय तमिळ चित्रपटांची निर्मिती केली आहे.
चित्रपटात नयनतारा, माधवन आणि सिद्धार्थ यासारखे चांगले कलाकार आहेत. टेस्ट हा चित्रपट क्रिकेटवर आधारित असून यात सिद्धार्थ एका क्रिकेटरची भूमिका साकारत आहे, तर माधवन यात प्रशिक्षकाच्या भूमिकेत आहे.
हाय-स्टेक क्रिकेटच्या पार्श्वभूमीवर आधारित ही एक भावनात्मक कहाणी असून जी एका राष्ट्रीय स्तराचा क्रिकेटपटू, एक प्रतिभाशाली वैज्ञानिक आणि एक भावुक शिक्षकाच्या जीवनाला संघर्षाच्या मार्गावर नेते आणि त्यांना असे पर्याय निवडण्यास भाग पाडते, जे त्यांची महत्त्वाकांक्षा, त्याग आणि साहसाची परीक्षा पाहते.