चिरंजीवीसोबत झळकणार नयनतारा
‘मेगा157’चे चित्रिकरण सुरू
‘मेगा 157’ या चित्रपटाचे चित्रिकरण सध्या सुरू झाले आहे. या चित्रपटात चिरंजीवी आणि नयनतारा हे दाक्षिणात्य दिग्गज मुख्य भूमिकेत आहेत. तर अनिल रविपुडी यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन करण्याची जबाबदारी स्वीकारली आहे. अलिकडेच या चित्रपटाच्या टीमने उत्तराखंडच्या मसूरीमध्ये चित्रिकरणाचा दुसरा टप्पा पूर्ण केला आहे.
निर्मात्यांनी आता एक छायाचित्र शेअर करत चित्रिकरणासंबंधी माहिती दिली आहे. मेगास्टार चिरंजीवीने प्रसिद्ध दिग्दर्शक अनिल रविपुडीसोबत एका कौटुंबिक मनोरंजक चित्रपटासाठी हातमिळवणी केली आहे. या चित्रपटाला तात्पुरत्या स्वरुपात ‘मेगा157’ नाव देण्यात आले आहे. या चित्रपटात चिरंजीवीसोबत नयनतारा मुख्य भूमिका साकारणार आहे. हा चित्रपट पुढील वर्षी प्रदर्शित होणार आहे.
या चित्रपटाची निर्मिती साहू गरपति आणि सुष्मिता कोनिडेला शाइन स्क्रीन आणि गोल्ड बॉक्स एंटरटेन्मेंट बॅनरच्या अंतर्गत केली जात आहे. तर या चित्रपटाला भीम्स सेसिरोलेओ याचे संगीत लाभणार आहे. तर कॅथरीन ट्रेसा या चित्रपटात सहाय्यक अभिनेत्री म्हणून दिसून येणार आहे.