‘मूकूथी अम्मन 2’मध्ये नयनतारा
नयनताराचा आगामी चित्रपट ‘मूकूथी अम्मन 2’च्या प्रदर्शनाची तारीख अखेर निश्चित झाली आहे. निर्मात्यांनी या चित्रपटाचा नवा टीझर सोशल मीडियावर जारी केला आहे. वेल्स फिल्म इंटरनॅशनल प्रॉडक्शन हाउसने सोशल मीडियावर टीझर शेअर करत हा चित्रपट हिंदी, तमिळ, तेलगू, कन्नड आणि मल्याळी भाषेत प्रदर्शित होणार असल्याचे सांगितले आहे. हा चित्रपट 6 नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे.
राइज ऑफ महाशक्ति टीझरची सुरुवात एका घोडेस्वाराने झऱ्यांनी वेढलेल्या गुहेत प्रवेश करण्यापासून होते, हा घोडेस्वार स्वत:च्या राणीला इशारा देण्यासाठी आलेला असतो. शत्रूचे सैनिक येथे येत आहेत, कारण त्यांना मूल कुठे आहे हे कळले आहे‘ असे तो सांगतो. कहाणी मग वर्तमान काळात प्रवेश करते, जेथे अभिनेत्री उर्वशी देवीची पूजा करत असते. कहाणी दोन वेगवेगण्dया कालावधींमध्ये घडत असल्याचे संकेत टीझरमध्ये मिळतात. मूकूथी अम्मन 2 हा चित्रपट मूकूथी अम्मनचा सीक्वेल आहे. हा चित्रपट 2020 साली ओटीटीवर प्रदर्शित झाला होता.