For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मोहनलाल, मामुटीच्या चित्रपटात नयनतारा

06:09 AM Feb 11, 2026 IST | Tarun Bharat Portal
मोहनलाल  मामुटीच्या चित्रपटात नयनतारा
Advertisement

अभिनेत्रीचे फर्स्ट लुक पोस्टर सादर

Advertisement

पॅट्रियट या आगामी चित्रपटातील अभिनेत्री नयनाताराचे फर्स्ट लुक पोस्टर सादर करण्यात आले आहे. या पोस्टरमध्ये नयनताराचा निम्मा चेहराच दिसून येत असून तिच्या चेहऱ्यावरील गंभीर भाव स्पष्टपणे पाहता येतात. पोस्टरमध्ये ‘विरोध करणे देशभक्ती आहे’ असे लिहिले असून हे चित्रपट सद्यकालीन सामाजिक-राजकीय मुद्द्यांशी निगडित असल्याचे संकेत देणारे आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन महेश नारायणन यांनी केले असून ते मल्याळी चित्रपटसृष्टीतील स्वत:च्या योगदानासाठी ओळखले जातात.

या चित्रपटात मोहनलाल, मामूटी, फहाद फासिल, कुंचाको बोबन, दर्शना राजेंद्रन आणि रेवती यासारखे अनेक कलाकार सामील आहेत. या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित करण्यात आला असून यात मोहनलाल हे कर्नल रहीम नाइकच्या भूमिकेत दिसून येतात, तर मामूटी हे डॉ. डॅनियल जेम्सची भुमिका साकारत आहेत. कहाणी याच दोन्ही भूमिकांच्या अवतीभवती गुंफण्यात आली असून ते एका बेकायदेशीर कारवाईला संपविण्यासाठी हात मिळवितात. टीझरमध्ये ‘पेरिस्कोप’ नावाचा एक रहस्मय एलिमेंटही दाखविण्यात आला असून एका स्टुडंट लॅपटॉम स्कीमचा उल्लेख आहे.

Advertisement

महेश नारायणन यांनीच या चित्रपटाची कहाणी लिहिली आहे. चित्रपटात सुशिन श्याम यांनी संगीत दिले आहे. तर निर्मिती पॅन-इंडिया अप्रोचकडून करण्यात आली असून याचे चित्रिकरण भारतासह श्रीलंका आणि युएईत पार पडले आहे. हा चित्रपट चालूवर्षीच प्रदर्शित केला जाणार आहे.

Advertisement
Tags :

.