‘कंचना 4’मध्ये नयनताराची एंट्री
हॉरर थ्रिलरमध्ये नोरा फतेही, पूजा मुख्य भूमिकेत
हॉरर थ्रिलर कंचना फ्रेंचाइजीचे आतापर्यंत तीन चित्रपट आले असून तिन्ही बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरले आहेत. आता राघव लॉरेन्स चौथा चित्रपट घेऊन येत असून यावेळी कहाणीत नवा ट्विस्ट जोडण्यासाठी लेडी सुपरस्टार येत आहे.
कंचना 4 चित्रपटात मुख्य भूमिकेत राघव लॉरेन्स असेल, परंतु नव्या अभिनेत्री चित्रपटाच्या कहाणीत ट्विस्ट आणणार आहेत. पूजा हेगडे आणि नोरा फतेही या चित्रपटाचा हिस्सा असतील. आता चित्रपटात तिसऱ्या अभिनेत्रीची म्हणजेच नयनताराची एंट्री झाली आहे. चित्रपटात नयनताराची भूमिका फ्लॅशबॅक दृश्यात दिसून येऊ शकते. परंतु तिच्या भूमिकेवरून अधिक माहिती समोर आलेली नाही.
राघव लॉरेन्सने 2011 मध्ये कंचना फ्रेंचाइजी सुरू केली होती. 15 वर्षांपूर्वी या हॉरर थ्रिलरला मोठी पसंती मिळाली होती. यानंतर 2015 मध्ये याचा सीक्वेल प्रदर्शित झाला, मग 2019 मध्ये फ्रेंचाइजीचा तिसरा चित्रपट आला होता. आता चौथा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.