For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

नक्षलींच्या हाती आता ‘संविधाना’ची प्रत

06:58 AM Oct 18, 2025 IST | Tarun Bharat Portal
नक्षलींच्या हाती आता ‘संविधाना’ची प्रत
Advertisement

छत्तीसगडमध्ये 208 नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण : मुख्यमंत्री विष्णुदेव साई यांच्या उपस्थितीत मुख्य प्रवाहात दाखल

Advertisement

वृत्तसंस्था/ जगदलपूर

छत्तीसगडमधील जगदलपूरमध्ये 208 नक्षलवाद्यांनी मुख्यमंत्री विष्णुदेव साई यांच्यासमोर आत्मसमर्पण केले. मुख्यमंत्री विष्णुदेव साई आणि उपमुख्यमंत्री विजय शर्मा यांच्याव्यतिरिक्त अनेक वरिष्ठ अधिकारी आणि सुरक्षा कर्मचारी व्यासपीठावर उपस्थित होते. शरणागती पत्करलेल्या नक्षलवाद्यांना कडक सुरक्षेत तीन बसेसमधून आत्मसमर्पणस्थळी आणण्यात आले. आत्मसमर्पण केलेल्या नक्षलवाद्यांपैकी बहुतेक महिला होत्या. केंद्रीय समिती सदस्य रुपेश यांना एका विशेष वाहनातून कार्यक्रमस्थळी आणण्यात आले. त्यानंतर सर्वांनी बंदुका खाली ठेवल्यानंतर  मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत त्यांच्या हाती संविधानाची प्रत देण्यात आली.

Advertisement

गेल्या दोन-तीन दिवसांपासून छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांची शरणागती मोहीम सुरू आहे. आता आत्मसमर्पण केलेल्या नक्षलींना मुख्य प्रवाहात सामावून घेण्यासाठी सरकारी प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. शुक्रवारी जगदलपूर येथे आयोजित कार्यक्रमात अनेक पोलीस अधिकारी व्यासपीठावर उपस्थित होते. बस्तरचे आयजी सुंदरराज पी यांनी कार्यक्रमाला संबोधित केले. आत्मसमर्पण केलेल्या नक्षलवाद्यांचे संविधानाची प्रत आणि गुलाबाचे फूल देऊन मुख्य प्रवाहात परत स्वागत करण्यात आले. प्रवक्त आणि केंद्रीय समिती सदस्य (सीसीएम) सतीश उर्फ टी वासुदेव राव उर्फ रुपेश यानेही आत्मसमर्पण केले. त्याच्यावर 1 कोटी रुपयांचे बक्षीस होते.

जगदलपूरमध्ये कडक सुरक्षेत 200 नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले. त्यांना तीन बसेसमधून पोलीस लाईनवर आणल्यानंतर त्यांनी मुख्यमंत्री विष्णुदेव साई यांच्यासमोर अधिकृतपणे आत्मसमर्पण केले. या नक्षलवाद्यांमध्ये गुरुवारी बस्तरमध्ये आत्मसमर्पण करणारे 140 आणि कांकेरमध्ये आत्मसमर्पण करणारे अंदाजे 60 नक्षलवाद्यांचा समावेश आहे. त्यापैकी बहुसंख्य महिला नक्षलवादीही होत्या. शरणागती पत्करलेल्या नक्षलवाद्यांकडे धोकादायक शस्त्रsदेखील होती. ते इंद्रावती नदीच्या उस्परी घाटावर सैनिकांसमोर एके-47, इन्सास, एसएलआर आणि .303 रायफल सारखी शस्त्रs घेऊन पोहोचले होते.

Advertisement
Tags :

.