For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सुरक्षा दलाच्या तळावर नक्षलवाद्यांचा हल्ला

07:00 AM Feb 16, 2024 IST | Tarun Bharat Portal
सुरक्षा दलाच्या तळावर नक्षलवाद्यांचा हल्ला
Advertisement

छत्तीसगडमधील घटना : नवीन कॅम्पच्या उभारणीवेळी गोळीबार

Advertisement

वृत्तसंस्था /विजापूर

छत्तीसगडमधील विजापूर जिह्यात पुन्हा एकदा नक्षलवादी आणि जवानांमध्ये चकमक झाली आहे. नक्षलवाद्यांनी यूबीजीएलने (अंडर बॅरल ग्रेनेड लाँचर) सुरक्षा दलाच्या नवीन पॅम्पवर हल्ला केला आहे. हल्ल्यानंतर जवानांनी प्रत्युत्तर दिल्यानंतर नक्षलवादी घनदाट जंगलात पळून गेले. नक्षलवादी मोठ्या हल्ल्याची योजना आखत होते, मात्र जवानांच्या सतर्कतेमुळे आणि तत्पर कारवाईमुळे त्यांचा डाव हाणून पाडला गेला. नक्षलवाद्यांनी गुंडम येथील सुरक्षा दलाच्या नवीन तळावर हल्ला केला. जवानांनी घटनास्थळावरून प्रत्येकी 5 किलो वजनाचे 6 आयईडी जप्त केले आहेत. या हल्ल्यात कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. सुरक्षा दलांकडून गुऊवारी गुंडम परिसरात नवीन पॅम्पची उभारणी सुरू केली होती. तळाची उभारणी सुरू असतानाच दुपारी 1 ते 1.30 च्या दरम्यान नक्षलवाद्यांनी बीजीएल येथून छावणीवर गोळीबार करण्यास सुऊवात केली. प्रत्युत्तरादाखल सुरक्षा दलांनीही गोळीबार सुरू केल्याने नक्षलवाद्यांनी पोबारा केला. विजापूर जिल्हा नक्षलग्रस्त भाग म्हणून ओळखला जातो. येथे सुरक्षा दलांकडून नक्षलवाद्यांना प्रभावित करण्यासाठी छावण्या उभारल्या जात आहेत.

Advertisement

छत्तीसगडमध्ये 2 महिन्यात 54 हल्ले

गेल्या दोन महिन्यात छत्तीसगडमध्ये 54 नक्षलवादी हल्ले झाले. या घटनांमध्ये आठ जवान हुतात्मा झाले. तर 53 हून अधिक जखमी झाले आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्री विजय शर्मा यांनी गुऊवारी विधानसभेत ही माहिती दिली. या काळात 8 हून अधिक नक्षलवादीही मारले गेल्याचे त्यांनी सांगितले. राज्याचे गृहखाते सांभाळणारे विजय शर्मा यांनी विरोधी पक्षनेते डॉ. चरणदास महंत यांच्या प्रश्नाच्या लेखी उत्तरात सदर माहिती दिली. 1 डिसेंबर 2023 ते 31 जानेवारी 2024 या कालावधीत नक्षलवाद्यांसोबत चकमकीच्या 54 नक्षलवादी घटना घडल्या आहेत. राज्यातील या घटनांमध्ये 7 पोलीस आणि केंद्रीय सुरक्षा दलाचे जवान आणि एक गुप्त सैनिक हुतात्मा झाला आहे. तसेच या काळात 53 जवान जखमी झाले आहेत.

Advertisement
Tags :

.