महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

छत्तीसगडमध्ये नक्षलींचा सीआरपीएफ तळावर हल्ला, 3 जवान हुतात्मा

06:45 AM Jan 31, 2024 IST | Tarun Bharat Portal
Naxalites attack
Advertisement

14 जवान जखमी : सुरक्षा दलाकडून शोधमोहीम

Advertisement

वृत्तसंस्था/ बिजापूर

Advertisement

छत्तीसगडच्या सुकमा- बिजापूर जिल्ह्याच्या सीमावर्ती क्षेत्रातील टेकलगुडेम गावात सीआरपीएफ तळावर नक्षलवाद्यांनी मोठा हल्ला केला आहे. या हल्ल्यात 3 जवान हुतात्मा झाले असून 14 जवान जखमी झाले आहेत. या जखमी जवानांना उपचारासाठी रुग्णालयात हलविण्यात आले आहे. तर हल्ल्याची माहिती कळताच अतिरिक्त कुमक घटनास्थळी दाखल झाली असून संबंधित परिसराला घेरून हल्लेखोरांचा शोध हाती घेण्यात आला आहे.

सुकमाच्या जगरगुंडा भागात नक्षलींच्या कारवारा रोखण्यासाठी आणि स्थानिक लोकांना मदत पुरविण्यासाठी 30 जानेवारी रोजी सुरक्षा कॅम्प स्थापन करण्यात आला होता. कँप स्थापन केल्यावर सीआरपीएफचे कोब्रा जवान जोनागुडा-अलीगुडा क्षेत्रात शोधमोहीम राबवत होते. याचदरम्यान या जवानांवर नक्षलवाद्यांकडून गोळीबार करण्यात आला आहे.

सुरक्षा दलांकडून देखील नक्षलवाद्यांना जोरदार प्रत्युत्तर देण्यात आले आहे. सुरक्षा दलांच्या कारवाईनंतर नक्षलवाद्यांनी घनदाट जंगलाचा लाभ घेत पलायन केले आहे. परंतु या चकमकीत 3 जवान गोळ्या लागल्याने हुतात्मा झाले आहेत.

मागील वर्षी डिसेंबर महिन्यात विष्णुदेव साय यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्यापूर्वी नक्षलवाद्यांनी हल्ला केला होता. 13 डिसेंबर रोजी नक्षलवाद्यांनी नारायणपूर येथे आयईडी स्फोट घडवून आणला होता, या स्फोटात एक जवान हुतात्मा झाला होता.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article