‘आय अॅम नॉट...’मध्ये नवाजुद्दीन
अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी स्वत:च्या चाहत्यांसाठी नवा चित्रपट घेऊन आला आहे. अभिनेत्याच्या आगामी चित्रपटाचे नाव ‘आय अॅम नॉट अॅन अॅक्टर’ आहे. निर्मात्यांनी या चित्रपटाचा ट्रेलर सार केला असून याच्या प्रारंभी दोन अभिनेते एका ऑडिशनमध्ये भाग घेताना आणि व्हिडिओ चॅटवर संभाषण करताना दिसून येतात. ‘अभिनयाची कला आणि क्राफ्टसाठी एका प्रशंसेसोबत एका अभिनेत्याच्या जीवनासाठी देखील...’ असे दिग्दर्शकाने ट्रेलर शेअर करत नमूद केले आहे. या चित्रपटाची निर्मिती मुंबा देवी मोशन पिक्चर्सकडून करण्यात आली आहे. चित्रपटात नवाजुद्दीनसोबत चित्रांगदा सतरुपा देखील मुख्य भूमिकेत आहे. चित्रपटाचा वर्ल्ड प्रीमियर कॅलिफोर्नियात ‘सिनेक्वेस्ट फिल्म फेस्टिव्हल 2025’मध्ये होणार आहे. आदित्य कृपलानीकडून दिग्दर्शित हा हिंदी-इंग्रजी ड्रामा पूर्णपणे मुंबईतील अभिनेत्याची कहाणी दर्शविणारा आहे. नवाजुद्दीन यापूर्वी ‘रौतू का राज’मध्ये मुख्य भूमिकेत दिसून आला होता. याचबरोबर नवाजुद्दीन हा मॅडॉक फिल्म्सच्या ‘थामा’ या चित्रपटात आयुष्मान खुराना आणि रश्मिका मंदाना यांच्यासोबत दिसून येणार आहे.