नवाब मलिक अजित पवार गटाबरोबर! शरद पवार गटाशी राखले अंतर
दाऊदशी संबंधित लोकांच्या जमिनीचा व्यवहार केल्याच्या आरोपांत इडीच्या आरोपानंतर तुरुंगवासातून जामिनावर बाहेर आलेल्या नवाब मलिक हे काल विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनासाठी नागपूरला रवाना झाले होते. अधिवेशनाला पोहोचल्यावर नवाब मलिक राष्ट्रवादीच्या कोणत्या गटासोबत जातील याविषयी आता चर्चेला पुर्ण विराम मिळाला असून नागपूर विधिमंडळामध्ये नवाब मलिक शिंदे- फडणवीस सरकारमद्ये नव्याने सामिल झालेल्या राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाच्या रांगेमध्ये अगदी शेवटला बसले होते.
गेल्या वर्षभारापासून इडीचा ससेमिरा लागलेल्या नवाब मलिका यांना अर्थिक अनियमितता या कारणाने चौकशीला सामोरे जावे लागले होते. तसेच त्यांना जवळजवळ वर्षभर तुरंगवासही भोगावा लागला होता. त्यानंतर राष्ट्रवादी पक्षामध्ये झालेल्या फुटीनंतर शिंदे- फडणवीस सरकारमध्ये नव्याने सामिल झालेल्या अजित पवार यांच्या समावेशाने सरकारची नव्याने फेरमांडणी झाली.
पण अजित पवार गट आणि शरद पवार गट या दोघांकडून नवाब मलिक यांच्यावर दावा सांगून ते आपल्याच बाजूने उभा राहतील असा दावा केला जात होता. तसेच यावर दोन्ही गटाकडून आपली मतमतांतरे व्यक्त केली गेली होती. पण आता या चर्चांना पुर्ण विराम मिळाला आहे.
महाराष्ट्राच्या विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन आजपासून नागपूरमध्ये होत असून त्यासाठी नवाब मलिक नागपूरला रवाना झाले. आज विधिमंडळात उशीरा पोहोचताना त्यांनी अजित पवार गटाच्या रांगेमध्ये बसून हजेरी लावली. त्यामुळे आता नवाब मलिक हे अजित पवार गटात सामिल झाले यावर शिक्कामोर्तब झाले असून त्यांनी शरद पवारांची साथ सोडल्याचे स्पष्ट झाले आहे.