नौदलाला मिळणार स्वदेशी बॉट्स
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
देशाच्या सुरक्षा दलात स्वदेशी उत्पादनांना चालना देण्याच्या दिशेने आणखी एक मोठे पाऊल उचलण्यात आले आहे. विमानवाहू जहाज आयएनएस विक्रांत आणि आयएनएस विक्रमादित्यसह सर्वात मोठय़ा युद्धनौकांवर स्वदेशी अग्निशमन बॉट्स (अग्निशमन करणारे यंत्रमानव) लवकरच तैनात केल्या जाणार असल्याची माहिती नौदलाचे व्हाईस ऍडमिरल एस. एन. घोरमाडे यांनी शनिवारी दिली.
‘मेड इन इंडिया’ प्रकल्पांतर्गत सागरी दलात घेतलेल्या पुढाकाराबाबत स्वदेशी प्रकल्पांसाठी पंतप्रधानांना दिलेले आश्वासन नौदल पूर्ण करू शकेल, असे भारतीय नौदलाचे उपप्रमुख व्हाईस ऍडमिरल एस. एन. घोरमाडे यांनी सांगितले. मेड इन इंडियाला चालना देण्यासाठी यापूर्वीच नौदलाने दोन करार केले आहेत. आता अग्निशमन बॉट्सही नौदलात येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. सदर बॉट्स सुरुवातीला विमानवाहू युद्धनौकांमध्ये तैनात होतील, असे त्यांनी पुढे स्पष्ट केले.
नौदलाला मोठे यश
भारतीय नौदल निळय़ा-हिरव्या लेसरसारखे गेमचेंजिंग तंत्रज्ञान समाविष्ट करण्यावर देखील काम करत आहे. या तंत्रज्ञानामुळे पाण्याखालील जहाजे आणि वस्तू शोधण्यात मदत होणार आहे. स्वदेशी संरक्षण तंत्रज्ञानाला प्रोत्साहन देण्यासाठी ‘आयडीईएक्स’ कार्यक्रम भारतीय नौदलासाठी एक मोठे यश असल्याचे प्रतिपादनही त्यांनी पेले. पंतप्रधानांनी 75 आव्हाने जारी केली असून आम्ही त्यावर वेगाने काम करत आहोत. 15 ऑगस्टपर्यंत आम्ही पंतप्रधान मोदींना दिलेल्या वचनानुसार आमचे लक्ष्य साध्य करू, असा आशावादही त्यांनी व्यक्त केला.
100 स्वदेशी लढाऊ विमानेही मिळणार
भारतीय नौदलासाठी 100 स्वदेशी डेक-आधारित लढाऊ विमाने तयार केली जातील. कॅबिनेट कमिटी ऑन सिक्मयुरिटी लवकरच त्याची रचना आणि विकास करण्याचा प्रस्ताव स्वीकारू शकते. या प्रकरणाशी संबंधित वरि÷ अधिकाऱयांनी 14 फेब्रुवारी रोजी बेंगळूर येथे सुरू असलेल्या एअर शो, एरो इंडियामध्ये ही माहिती दिली. 2031-32 पर्यंत सदर लढाऊ विमाने नौदलाचा भाग बनण्याची अपेक्षा आहे.