For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement
Maharashtra Government – Diwali

नौदलाला मिळणार आठ अत्याधुनिक युद्धनौका

06:31 AM Oct 31, 2026 IST | Tarun Bharat Portal
नौदलाला मिळणार आठ अत्याधुनिक युद्धनौका
Advertisement

केंद्र सरकारची 40,000 कोटींच्या खर्च प्रस्तावाला मंजुरी

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील सुरक्षाविषयक मंत्रिमंडळ समितीने (सीसीएस) भारतीय नौदलासाठी आठ नवीन कॉर्व्हेट युद्धनौकांच्या निर्मितीला मंजुरी दिली आहे. या प्रकल्पासाठी 40,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च येईल. या युद्धनौकांसाठी लागणारे 70 टक्क्यांपेक्षा जास्त भाग भारतातच तयार होणार असल्यामुळे देशातील संरक्षण उत्पादनाला चालना मिळेल. वृत्तानुसार, पहिल्या युद्धनौकेचे बांधकाम वर्षभरात सुरू होण्याची शक्यता असून, 2030 पर्यंत नौदलाला त्या सुपूर्द करण्याचे लक्ष्य आहे.

Advertisement

नव्याने दाखल होणाऱ्या आठ युद्धनौका कोलकाता येथील गार्डन रीच शिपबिल्डर्स अँड इंजिनियर्स आणि गोवा शिपयार्ड लिमिटेड (जीएसएल) या दोन सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांद्वारे बांधल्या जातील. दोन्ही कंपन्यांसोबत बांधकाम करारावर येत्या काही दिवसांत स्वाक्षरी होण्याची शक्यता आहे. संरक्षण सूत्रांनुसार, अलीकडच्या काळात उच्चस्तरीय सरकारी मंजुरी मिळालेला हा पहिला मोठा संरक्षण प्रकल्प आहे. या प्रकल्पामुळे भारतीय नौदलाची ताकद वाढेल आणि देशांतर्गत युद्धनौका बांधणीला प्रोत्साहन मिळेल.

युद्धनौकांची डिलिव्हरी पुढील 4-5 वर्षांत

या युद्धनौकांमधील 70 टक्क्यांपेक्षा जास्त भाग भारतातच तयार केले जातील. यामुळे आत्मनिर्भर भारत अभियान आणि देशांतर्गत संरक्षण उत्पादनाला चालना मिळेल. सर्व आठ युद्धनौका भारतातच बांधल्या जातील, ज्यामुळे सरकारच्या ‘सागर’ संकल्पनेला बळकटी मिळेल. या युद्धनौकांची डिलिव्हरी पुढील चार ते पाच वर्षांत सुरू होण्याची शक्यता आहे. हिंद महासागरातील वाढत्या सुरक्षा आव्हानांच्या पार्श्वभूमीवर भारतीय नौदल आपल्या ताफ्याचे आधुनिकीकरण करत असतानाच या प्रकल्पाला मंजुरी मिळाली आहे.

यावर्षी 21 जून रोजी तीन स्वदेशी युद्धनौका भारतीय नौदलात सामील करण्यात आल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचा कमिशनिंग सोहळा पार पाडला. आयएनएस शोधन एकावेळी सलग 12,000 किलोमीटरपर्यंत प्रवास करू शकते. आयएनएस दुनागिरी आठ ब्रह्मोस क्षेपणास्त्रांनी सुसज्ज आहे. तर, आयएनएस अग्रया भारतीय किनारपट्टीजवळ शत्रूच्या पाणबुड्या नष्ट करू शकते.

Advertisement
Tags :

.