For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

नेव्हीसह विद्यापीठाची परीक्षा एकाच दिवशी

12:07 PM May 22, 2025 IST | Radhika Patil
नेव्हीसह विद्यापीठाची परीक्षा एकाच दिवशी
Advertisement

कोल्हापूर :

Advertisement

शिवाजी विद्यापीठांतर्गत मार्च-एप्रिल 2025 उन्हाळी सत्रातील पदवी व पदव्युतर अभ्यासक्रमाच्या परीक्षा सुरू आहेत. रविवारी, 25 रोजी एकाच दिवशी शिवाजी विद्यापीठातील कॉमन विषयाच्या आणि भारतीय नौदल (नेव्ही) मधील अनेक पदांच्या भरतीसंदर्भातील परीक्षा आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना नेमका कोणता पेपर द्यायचा, असा प्रश्न पडला आहे. विद्यार्थी हित लक्षात घेऊन विद्यापीठाने 25 रोजी होणारे पेपर पुढे ढकलावेत, अशी मागणी विद्यार्थी पालकांकडून होत आहे.

शिवाजी विद्यापीठांतर्गत उन्हाळी सत्रातील बी.एस्सी. भाग एकचा पेपर आणि भारतीय नौदल (नेव्ही) भरतीचा पेपर 25 रोजीच आहे. त्यामुळे नेव्ही भरतीचा पेपर द्यायचा की बी.एस्सी.चा पेपर द्यायचा, असा प्रश्न विद्यार्थ्यांसमोर निर्माण झाला आहे. तरी विद्यापीठाने विद्यार्थीहित लक्षात घेऊन रविवारचे पेपर पुढे ढकलावे, अथवा संबंधित पेपर खेळाडूंच्या परीक्षेवेळी घ्यावे, अशी मागणी विद्यार्थ्यांकडून होत आहे.

Advertisement

  •  शेकडो विद्यार्थी देतात नेव्हीची परीक्षा

कोल्हापूर, सांगली, सातारा, रत्नागिरी, सोलापूर आणि गोवा राज्यातील जवळपास 97 हजार उमेदवार आर्मी भरती परीक्षा देतात. भारतीय नौदलाची परीक्षा सर्वसाधारण 100 ते 120 विद्यार्थी परीक्षा देतात. त्यामुळे विद्यापीठाने या परीक्षा पुढे ढकलाव्यात, अशी मागणी आहे.

  • विद्यापीठाला सूचना नसल्याने पेपर पुढे ढकलता येत नाही

विद्यापीठ प्रशासन केंद्रीय आणि राज्यस्तरीय स्पर्धा परीक्षांसंदर्भात आलेल्या सूचनांनुसार विद्यापीठ परीक्षांचे वेळापत्रक तयार केले जाते. त्यामुळे स्पर्धा परीक्षा ज्या दिवशी असेल त्या दिवशी विद्यापीठाचा कोणत्याही अभ्यासक्रमाची परीक्षा घेतली जात नाही. परंतु भारतीय नौदल किंवा भारतीय सैन्य दलाच्या भरती परीक्षेसंदर्भात विद्यापीठाला कोणत्याही सूचना नसतात. त्यामुळे शिवाजी विद्यापीठाचे पेपर नियमानुसार पुढे ढकलता येत नाहीत.

                                                                   डॉ. अजितसिंह जाधव, संचालक, परीक्षा व मूल्यमापन मंडळ, शिवाजी विद्यापीठ

Advertisement
Tags :

.