For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

नौदलाने वाढवली अरबी समुद्रात गस्त

06:24 AM Jan 01, 2024 IST | Tarun Bharat Portal
नौदलाने वाढवली अरबी समुद्रात गस्त
Advertisement

व्यापारी जहाजांवरील हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर दक्षता

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

समुद्रातील वाढत्या हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर भारतीय नौदलाने सागरी दरोडेखोरांचे मनसुबे उधळून लावण्यासाठी कंबर कसली आहे. भारतीय नौदलाने अरबी समुद्रात गस्त, पाळत आणि सतर्कता वाढवली आहे. अरबी समुद्रातील व्यावसायिक जहाजांवर होणारे हल्ले पाहता नौदलाने लांब पल्ल्याची पी-8आय गस्ती विमाने आणि देखरेखीसाठी आयएनएस मार्मागोवा, आयएनएस कोची आणि आयएनएस कोलकाता आदींची तैनाती केली आहे. भारतीय नौदलाकडून संपूर्ण परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे.

Advertisement

गेल्या काही आठवड्यांमध्ये लाल समुद्र, एडनचे आखात आणि अरबी समुद्रात आंतरराष्ट्रीय शिपिंग लेनमधून जाणाऱ्या व्यापारी जहाजांवर ड्रोन हल्ल्यांच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. इराण-समर्थित हुथी बंडखोर पूर्वी इस्रायलच्या हमास विऊद्धच्या युद्धाच्या निषेधार्थ लाल समुद्रातून जाणाऱ्या इस्रायली जहाजांना लक्ष्य करत होते. या हुथी बंडखोरांनी लाल समुद्रातील अनेक व्यापारी जहाजांनाही लक्ष्य केल्यामुळे व्यापारी जहाजांचे मार्ग बदलण्यास आले आहेत.

वाढत्या हल्ल्यांमुळे आता नौदलाने विनाशक आणि फ्रिगेट्स अशा नौदल टास्क ग्रुप्सचा समावेश असलेल्या साधनांचा वापर वाढवला आहे. व्यापारी जहाजांवर हल्ल्याची कोणतीही घटना घडल्यास मदत करण्यासाठी अतिरिक्त सुरक्षा जहाजे तैनात करण्यात आली आहेत. तसेच हिंदी महासागरातील नवीन सुरक्षा धोक्मयांचा तपास करण्यासाठी तटरक्षक दलही सक्रीयपणे कार्य करत आहे. भारतीय नौदल प्रमुखांनी या भागात कोणत्याही संशयास्पद हालचालींवर बारीक नजर ठेवली जात असल्याचे सांगितले.

सागरी गस्त कडक

भारतीय नौदलाने अरबी समुद्राच्या मध्य आणि उत्तर भागात सागरी पाळत ठेवण्याचे प्रयत्न वाढवले आहेत. लाल समुद्र, एडनचे आखात आणि मध्य/उत्तर अरबी समुद्रातील आंतरराष्ट्रीय शिपिंग मार्गांमधून जाणाऱ्या व्यापारी जहाजांवर हल्ले होण्याच्या वाढत्या घटनांदरम्यान ही सतर्कता बाळगली जात आहे. सागरी सुरक्षा कार्ये चालवण्यासाठी आणि कोणतीही घटना घडल्यास व्यापारी जहाजांना मदत करण्यासाठी विनाशक आणि फ्रिगेट्सचा समावेश असलेले कार्यगट देखील तैनात करण्यात आले आहेत.

Advertisement
Tags :

.