For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

नौदलाच्या ताफ्यात 6 अत्याधुनिक पाणबुड्यांचा होणार समावेश

01:03 AM Jun 18, 2024 IST | Tarun Bharat Portal
नौदलाच्या ताफ्यात 6 अत्याधुनिक पाणबुड्यांचा होणार समावेश
Advertisement

स्पेनमध्ये होणार परीक्षण : भारतीय कंपन्यांचा प्रकल्पात सहभाग

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

भारतीय नौदल स्पेनमध्ये ‘प्रोजेक्ट 75 भारत (पी75आय)’ अंतर्गत अत्याधुनिक उपकरणांचे परीक्षण करणार आहे. स्पेनची एक जहाजबांधणी कंपनी नवंतियानुसार या परीक्षणानंतर भारतीय नौदल 6 अत्याधुनिक पाणबुड्यांना स्वत:च्या ताफ्यात सामील करणार आहे.

Advertisement

स्पेनचे सरकार आणि नौदल पी75आय वरून अत्यंत उत्साही आहे. अशाप्रकारच्या प्रकल्पात भारताची मदत करण्याची आमची इच्छा आहे. या योजनेच्या अंतर्गत भारत सरकारसोबत एका करारावर स्वाक्षरी केली जाणार आहे. जूनच्या अखेरच्या आठवड्यापासून भारतीय नौदल कार्टाजेनाच्या प्रकल्पात एअर इंडिपेंडेंट प्रोपल्शनचे परीक्षण सुरू करणार असल्याचे नवंतिया कंपनीचे अध्यक्ष रिकार्डो डोमिंगुज गार्सिया बाकुएरो यांनी सांगितले.

या परीक्षणात भारतीय कंपनी लार्सन अँड टुब्रो साथ देणार आहे. परीक्षणादरम्यान भारतीय नौदलाला जागतिक स्तराच्या एआयपी तंत्रज्ञानाची माहिती दिली जाणार असल्याचे रिकार्डो डोमिंगुज यांनी सांगितले. भारतीय नौदल एआयपी तंत्रज्ञानाने सज्ज 6 पाणबुड्यांचे अधिग्रहण करणार आहे. या तंत्रज्ञानाच्या मदतीने पाणबुड्या दीर्घकाळापर्यंत पाण्याच्या आत राहू शकतात. भारतीय नौदलाकडे यापूर्वी एआयपी सिस्टीम असणारी पाणबुडी नव्हती.

सुमारे 60 हजार कोटी रुपयांच्या या प्रकल्पात एलअँडटी आणि नवंतिया सोबत  जर्मनीची थिसेनक्रूप मरीन सिस्टीम्स आणि भारताची मझगाव डॉकयार्ड्स लिमिटेड देखील सामील आहे. भारतीय नौदलाच्या प्रकल्पासाठी एस-80 पाणबुडीचे डिझाइन सादर केले आहे. यातील एक पाणबुडी चालू वर्षात स्पॅनिश नौदलात सामील झाली आहे. एस-80 ही पाणबुडी कुठल्याही पुनर्निर्मितीशिवाय पी75(आय) च्या तांत्रिक आवश्यकता सहजपणे पूर्ण करत असल्याचा दावा नवंतिया कंपनीने केला आहे.

Advertisement

.