नौदल प्रमुख दिनेश त्रिपाठी अमेरिकेच्या दौऱ्यावर
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारतीय नौदलाचे प्रमुख अॅडमिरल दिनेश त्रिपाठी हे अमेरिकेच्या दौऱ्यावर रवाना झाले आहेत. त्यांचा हा दौरा 17 नोव्हेंबरपर्यंत चालणार असून याचा उद्देश भारतीय नौदल आणि अमेरिकेच्या नौदलादरम्यान मजबूत आणि स्थायी सागरी भागीदारी आणखी मजबूत करणे आहे. याचबरोबर नौदल प्रमुख त्रिपाठी हे अमेरिकेच्या युद्ध विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत विचारविनिमय करणार आहेत. अमेरिकेच्या हिंद-प्रशांत कमांडचे कमांडर अॅडमिरल सॅमुअल जे. पापारो आणि पॅसिफिक कमांडचे कमांडर अॅडमिरल स्टीफन कोहलर यांची भेट घेणार आहेत.
भारत आणि अमेरिकेदरम्यान दीर्घकालीन सागरी भागीदारी असून ती परस्पर विश्वास आणि संयुक्त मूल्यांवर आधारित आहे. नौदल प्रमुखांचा हा दौरा एक स्वतंत्र, खुल्या, समावेशक आणि नियम-आधारित हिंद-प्रशांत क्षेत्राच्या दृष्टीकोनाला साकार करण्याकरता अमेरिकेच्या नौदलासोबत सहकार्याला दृढ करण्यासाठी भारतीय नौदलाच्या प्रतिबद्धतेला अधोरेखित करतो.