महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

तालुक्यात नवरात्रोत्सवाला भक्तिमय वातावरणात प्रारंभ

11:26 AM Oct 04, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

विविध मंदिरांमध्ये घटस्थापना : काकड आरती, भजन, प्रवचन, कीर्तन कार्यक्रमांचे आयोजन : नऊ दिवस विविध आध्यात्मिक कार्यक्रम

Advertisement

वार्ताहर/किणये

Advertisement

तालुक्यात गुरुवारपासून नवरात्रोत्सवाला मोठ्या उत्साहात व भक्तिमय वातावरणात प्रारंभ झाला आहे. मंदिरांमध्ये विधिवत पूजा करून घटस्थापना करण्यात आली. पहाटे काकडारती, दिवसभर भजन, सायंकाळी प्रवचन, कीर्तन आदी कार्यक्रम सुरू झाले असून येणाऱ्या नऊ दिवसात आध्यात्माचा जागर करण्यात येणार आहे. नवरात्रोत्सवानिमित्त देवी-देवतांच्या मंदिरांना आकर्षक रंग-रंगोटीसह विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. ग्रामीण भागात पारंपारिक पद्धतीने नवरात्रोत्सव साजरा करण्यात येतो. यंदाही हा सण साजरा करण्यासाठी पंचमंडळी व ग्रामस्थांनी जय्यत तयारी केली आहे. गुरुवारी पहाटे बहुतांशी मंदिरांमध्ये टाळ मृदंगाच्या गजरात काकडारती करण्यात आली. आरतीला महिला आरती घेऊन मोठ्या प्रमाणात सहभागी झालेल्या पहावयास मिळाल्या. घटस्थापनेपासून नऊ दिवस विविध आध्यात्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. मंदिरांमध्ये नऊ दिवस दीप तेवत ठेवण्यात येतो.

नऊ दिवस मंदिरात वास्तव्य

काही मंदिरांमध्ये दसऱ्यापर्यंत भक्त मंदिरांमध्येच राहतात. त्यांना खाण्यासाठी लागणारे भोजन व फळे त्यांच्या कुटुंबातील सदस्य व नातेवाईक मंदिरात आणून देतात. मंदिरामध्ये नऊ दिवस राहून भक्ती करण्याची परंपरा ग्रामीण भागात आजही टिकून आहे. काही नागरिक घरांमध्येही नऊ दिवस विविध पूजा करतात.

बेळगुंदी येथील रवळनाथ मंदिर

बेळगुंदी येथील रवळनाथ मंदिरात गुरुवारी नवरात्रोत्सव प्रारंभाच्या दिवशी विशेष पूजा करण्यात आली. दिवसभर भक्तांनी मंदिरात येऊन दर्शनाचा लाभ घेतला. सोनोली गावातील दुर्गामाता मंदिरातही महिलानी दर्शनासाठी गर्दी केली होती. देसूर येथील सातवी माउली मंदिरात सकाळी पूजा करण्यात आली. काही मंदिरांमध्ये गुरुवारी सकाळी घटस्थापना केली तर काही ठिकाणी सायंकाळी घटस्थापना करण्यात आली.

हलगा येथे दुर्गामाता मूर्तीची प्रतिष्ठापना

लक्ष्मी गल्ली, हलगा येथील शिवसेना शिवजयंती उत्सव मंडळ व सार्वजनिक गणेशोत्सव तऊण युवक मंडळातर्फे गल्लीत गुरुवारी सायंकाळी दुर्गामाता मूर्तीची प्रतिष्ठापना केली. गावात मूर्तीची वाद्यांच्या गजरात जल्लोषात मिरवणूक काढली. मंडळातर्फे नऊ दिवस विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.

पिरनवाडी कालिका मंदिरात विशेष पूजा

कालिकानगर, पिरनवाडी येथील कालिका मंदिरात गुऊवारी घटस्थापनेच्या दिवशी देवीची विशेष पूजा करण्यात आली. नऊ दिवसांमध्ये विविध अध्यात्मिक व मनोरंजनांचे कार्यक्रम आयोजित केले आहेत. किणये, बहाद्दरवाडी, कर्ले, नावगे, मच्छे, पिरनवाडी, बामणवाडी, बाळगमट्टी राकेसकोप, सोनोली, यळेबैल, वाघवडे, झाडशहापूर, हुंचेनहट्टी, बस्तवाड, बिजगर्णी, कावळेवाडी, इनाम बडस, बेळवट्टी आदी गावात नवरात्रोत्सवानिमित्त पूजा करण्यात आली.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article