कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

कंग्राळी बुद्रुक येथे नवरात्रोत्सवास दिमाखात प्रारंभ

11:06 AM Sep 24, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

नवरात्रोत्सवाला भक्तिभावाने प्रारंभ : मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई 

Advertisement

वार्ताहर/कंग्राळी बुद्रुक 

Advertisement

जागृत ग्रामदैवत व पंचक्रोषीतील श्रद्धास्थान श्री कलमेश्वर देवस्थान मंदिरामध्ये दि. 22 रोजी घटस्थापनेच्या शुभमुहूर्तावर परंपरेनुसार नवरात्रोत्सवाला  भक्तिभावाने सुरूवात झाली. यानिमित्त कलमेश्वर गल्ली प्रवेशद्वारापासून मंदिरपर्यंत विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.

9 दिवस भक्तांचा मंदिरात मुक्काम

नवरात्रोत्सव काळामध्ये कंग्राळी पंचक्रोषीतील तसेच तालुक्यातील इतर गावातील 100 हून अधिक भक्त आपले नवस फेडतात. घटस्थापनेपासून विजयादशमीपर्यंत मंदिरामध्ये सकाळी व संध्याकाळी अल्पोपहार करून नऊ दिवस मंदिरामध्ये नामस्मरण करतात. या काळात दररोज रात्री मंदिरासभोवती कलमेश्वर देवस्थान पालखीची प्रदक्षिणा घालून गाऱ्हाणे घालतात. अशा धार्मिक विधी नऊ दिवस अखंड सुरू असतात.

अष्टमी दिवशी जागर भजन 

अष्टमी दिवशी कलमेश्वर देवस्थानची पालखी मंदिराबाहेर ठेवून भारुडी भजनाच्या भक्तिमय कार्यक्रमाबरोबर जागर भजन होते.

विजयादशमी दिवशी बंधुभेट 

विजयादशमी दिवशी पालखी गावच्या पूर्व दिशेला असलेल्या श्री सिद्धेश्वर देवस्थानकडे नेली जाते. तेथे कलमेश्वर व सिद्धेश्वर भाऊ असल्यामुळे दोन्ही भावांची वर्षातून एकदा भेट घडवून आणली जाते, अशी अख्यायिका असल्याचे जणकाराकडून सांगण्यात येते. पालखीचे सिद्धेश्वर देवस्थानकडे प्रस्थान होताना भक्तांकडून हर हर महादेवचा जयघोष केला जातो. पालखी कलमेश्वर गल्ली, चव्हाट गल्ली, शास्त्राrनगर परिसरातून श्री सिद्धेश्वर देवस्थानकडे येते. त्याठिकाणी चौगुलाकडून गाऱ्हाणा घातला जातो. यानंतर परत पालखीचे गावाकडे प्रस्थान होते. पालखी गावात आल्यानंतर विठ्ठल-रखुमाई मंदिरपासून भजनाच्या निनादात पालखी मिरवणुकीला प्रारंभ होतो. बाहेर गल्ली, लक्ष्मी गल्ली, नेताजी गल्ली,  कलमेश्वर गल्ली येथे पालखीला आरती ओवाळून श्रीफळ वाढविले जाते. शेवटी कलमेश्वर मंदिरकडे पालखी आल्यानंतर प्रदक्षिणा घालून नवरात्रोत्सवाची सांगता होते.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article