कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

Navratri 2025 Navdurga Shri Lakshmi: संपत्तीची सागरस्वरुप देवता श्री लक्ष्मी!

01:37 PM Sep 30, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

करवीर क्षेत्रात मात्र पाच दुर्गेची रुपे आणि चार लक्ष्मीचे रुपे आहेत

Advertisement

By :  दिव्या कांबळे

Advertisement

कोल्हापूर : नवदुर्गा यात्रा परिक्रमेतील नववी दुर्गा म्हणजे, श्री लक्ष्मी. संपदा म्हणजे, श्री लक्ष्मी. सर्व ऐहिक, पारलौकीक संपत्तीची सागरस्वरूप देवता म्हणून श्री लक्ष्मीकडे पाहिले जाते. या देवीची महती उमाकांत राणिंगा यांनी ‘तरुण भारत संवाद’च्या नवदुर्गा विशेष पर्वात सांगितली.

करवीर नगरीची दक्षिण काशी म्हणून असलेली महती आणि ती महती वर्णन करणारा करवीर महात्म्य हा ग्रंथ. या ग्रंथाच्या आधारावर या करवीर नगरीतील वेगवेगळ्या तीर्थयात्रांची परिक्रमा प्रसिद्ध करण्यात आली आहे. यामध्ये 12 प्रकारच्या यात्रा सांगितल्या आहेत. त्यातील महत्त्वाची यात्रा म्हणजे नवदुर्गा. त्या अनुषंगाने दुर्गेची नऊ रूपे आहेत, असे म्हटले आहे.

तथापि, करवीर क्षेत्रात मात्र पाच दुर्गेची रुपे आणि चार लक्ष्मीचे रुपे आहेत. या करवीर नगरीमध्ये या देवतांचे स्थान प्राचीन होते. नवदुर्गा परिक्रमेतील नववी दुर्गा म्हणजे श्री लक्ष्मी. या देवीच्या दोन्ही बाजूंनी दोन हत्ती तिच्यावर अभिषेक करत आहेत. ही देवता कमलजा रुपातील लक्ष्मी आहे. देवीची मूर्ती चतुर्भुज आहे.

करवीर निवासिनीचे दर्शन घेऊन नवदुर्गा यात्रा आरंभ करून हत्ती महाल रोडवर असणारी श्री लक्ष्मी अर्थात गजेंद्रलक्ष्मीचे दर्शन घेऊन या यात्रेची सांगता करण्याची परंपरा आहे, असे उमाकांत राणिंगा यांनी सांगितले. नवदुर्गांचा क्रम यात्रेच्या अनुसार ठरवलेला असला, तरी या सर्व देवतांचे महत्त्व एकसारखे आहे. या यात्रा परिक्रमेतील अखेरची म्हणजे नववी देवता ही लुगडीओळ म्हणून परिचित असणाऱ्या परिसरात आहे.

पूर्वीच्या काळामध्ये छत्रपती शाहूंच्या काळामध्ये या परिसराला हत्ती महालरोड असे म्हटले जात होते. कारण या ठिकाणी हत्ती ठेवले जात होते. हत्तीवर विराजमान होण्यासाठी केलेली व्यवस्था आज देखील तिथे अस्तित्वात आहे. नंतरच्या काळात हत्ती संपुष्टात आले आणि त्या रस्त्याचे नाव देखील बदलण्यात आले.

या हत्तीमहाल रोडवरती हत्तीने अभिषेक केलेली स्त्रीदेवी या नावाने करवीर महात्म्यामध्ये तिचा उल्लेख आढळतो. अशा श्री लक्ष्मीचे शिल्प असलेले एक प्राचीन मंदिर आहे. हे मंदिर किती प्राचीन असावे याचे उत्तर सांगताना उमाकांत राणिंगा म्हणतात की, तेराव्या शतकामध्ये रचल्या गेलेल्या करवीर महात्म्यामध्ये या मूर्तीचे वर्णन आहे. ज्या मंदिरामध्ये मूर्ती स्थापित आहे त्या मंदिराची रचना इतकी प्राचीन नाही, हे निश्चितपणे सांगता येते.

मायाशक्ती आणि लक्ष्मी दोहाचे अखंड रूप म्हणजे ही लक्ष्मीदेवीच होय. विष्णू आणि शक्तीचे अखंड रूप म्हणजे देखील श्रीलक्ष्मी होय. मंदिरातील देवीच्या रुपामध्ये लक्ष्मीरूप आढळते. या लक्ष्मीची कृपादृष्टी आपल्यावर रहावी यासाठी श्रावण आणि अश्वीन मासामध्ये अनेक भाविक श्री लक्ष्मीच्या ठायी माथा ठेवण्यासाठी मंदिरात येत असतात. नवरात्रीच्या मंगलमय वातावरणात भाविक मनोभावे पूजा करतात. मनातील इच्छा देवीला सांगतात

Advertisement
Tags :
@KOLHAPUR_NEWS#aambabaitempal#navdurga#tarun_bharat_news#tarunbharat_official#tarunbharatSocialMediakarveer navdurganavratri 2025 navdurga kolhapursadetin shakti peeth
Next Article