कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

Navratri 2025 Ambabai Temple: नवरात्रीच्या दुसऱ्या माळेला सव्वातीन लाखांवर भाविक अंबाबाई चरणी

01:04 PM Sep 24, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

खासदार सुप्रिया सुळे, विनायक राऊत यांच्यासह अनेक महनीय व्यक्तींनी दर्शन घेतले

Advertisement

कोल्हापूर : सोमवारप्रमाणे मंगळवारीही परजिह्यातील भाविकांची पाऊले करवीर निवासिनी अंबाबाई व तुळजा भवानीचे दर्शन घेण्यासाठी कोल्हापूरकडे वळू लागली आहेत. खासदार सुप्रिया सुळे, विनायक राऊत यांच्यासह अनेक महनीय व्यक्तींनी अंबाबाईचे दिवसभरात दर्शन घेतले.

Advertisement

मंगळवारी पहाटेपासून दुपारी 1 वाजेपर्यंतच्या कालावधीत भाविकांनी बऱ्यापैकी दर्शन मंडप भरला होता. परंतू दुपारपासून ते रात्री मंदिर बंद होईपर्यंत दर्शन मंडप मोकळा राहिला होता. बहुतांश भाविकांनी दर्शन मंडपातून अंबाबाई मंदिराच्या जाण्याऐवजी मंदिराच्या अंतरंगातील गणपती चौकातूनच अंबाबाईच्या नित्त पूजेचे व दुपारनंतर बांधलेल्या श्री बगलामाता स्वरूपातील पूजेचे दर्शन घेणे पसंत केले.

अंबाबाईच्या दर्शनानंतर तुळजा भवानीमातेचेही दर्शन घेण्यासाठी भाविकांनी गर्दी केली होती. व्हाईट आर्मी, अॅस्टर आधार व अॅपल सरस्वती रुग्णालयाच्या वतीने अंबाबाई मंदिराच्या दक्षिण दरवाजाजवळ आरोग्य तपासणी केंद्राची उभारणी करण्यात आली आहे. गेल्या दोन दिवसात 503 भाविकांची केंद्रात आरोग्य तपासणी केली आहे.

आठ ते दहा डॉक्टर रुग्णसेवा देत आहेत. केंद्रात हिरकणी कक्षाची उभारणी केली आहे. देवस्थानकडून बेबी केअर सेंटरची उभारणी अंबाबाई मंदिरजवळील शेतकरी संघ कार्यालयाजवळील दर्शन मंडपात पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीकडून बेबी केअर सेंटरची उभारणी करण्यात आली आहे. या कक्षामध्ये लहान मुलांसाठी खेळण्यांची व्यवस्था केली आहे.

प्राची प्रसादे-देऊलकरांच्या कथ्थकला दाद...

पुण्याच्या नर्तिका प्राची प्रसादे-देऊलकर यांनी सायंकाळी कथ्थक नृत्य सादर केले. त्यांनी महालक्ष्मी अष्टकम, गुरुवंदना, अर्धांग, आदींची रचना कथ्थकमधून भाविकांसमोर मांडली. पुण्यातीलच स्वरदा संगीतच्या मीरा भावे, शामली कुलकर्णी, स्वाती आपटे, यांच्यासह अन्य महिला गायकांनी देवदेवतांवर रचलेली भाव व भक्तीगित सादर करुन भक्तरस पाझरला. मास्टर स्ट्रोकच्या गायकांनी भक्तिगीते सादर करुन उपस्थितांना डोलवले.

कार्यक्रमांना भाविकांची गर्दी...

अंबाबाई मंदिरात उपस्थित शेकडो भाविकांकडून सकाळी वेदा सोनुले-झुरळे यांनी ललित सहस्त्रनाम व जगदीश गुळवणी यांनी श्री सुक्त पठण करवून घेतले. यानंतर दिवसभरात हडपसर (पुणे) येथील श्री गुरुदेव दत्त भजनी मंडळ, कबनूर येथील गजानन भजनीम मंडळ, उजळाईवाडी येथील ज्ञानेश्वर भजनी मंडळ, कोल्हापुरातील जनसेवा महिला भजनी मंडळाने देववेदतांची स्तुती करणारी भजने सादर केली.

विशेष पोलीस निरीक्षकांच्या हस्ते पालखी पूजन

मंगळवारी रात्री साडेनऊ वाजता अंबाबाईचा पालखी सोहळा साजरा करण्यात आला. दीड तास राहिलेल्या या सोहळ्यासाठी पालखीला पुष्पवृष्टी स्वरुपात फुलांनी सजवण्यात आले होते. विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांच्या हस्ते पालखीचे पूजन केले.

यानंतर मानकऱ्यांनी पालखीला खांद्यावर घेऊन अंबाबाई मंदिराला प्रदक्षिणा घातली. पालखीचे दर्शन घेण्यासाठी ज्या पटीत मंदिर आवारात गर्दी होती, त्याच पटीत मंदिराच्या घाटी दरवाजाबाहेरील जोतिबा रोड व गुजरीमध्ये भाविकांनी गर्दी केली होती.

Advertisement
Tags :
@KOLHAPUR_NEWS#ambabai_mandir#tarun_bharat_news#tarunbharat_official#tarunbharatSocialMediaAmbabai templenavratri 2025 ambabai templesupriya suleVinayak Raut
Next Article