For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Navratri 2025 Ambabai Temple: अंबाबाई मंदिरात नगरप्रदक्षिणा सोहळा आज होणार

03:26 PM Sep 30, 2025 IST | Tarun Bharat Portal
navratri 2025 ambabai temple  अंबाबाई मंदिरात नगरप्रदक्षिणा सोहळा आज होणार
Advertisement

अंबाबाई मंदिरात नगरप्रदक्षिणा सोहळा रात्री साडेनऊ वाजता होणार

Advertisement

कोल्हापूर : नवरात्रोत्सवाच्या नवव्या माळेला मंगळवारी देवदेवतांचा जागर करण्यात येणार आहे. जुना राजवाड्यातील तुळजाभवानी मंदिरामधील भवानीमातेची पालखी सकाळी 11 वाजता नगरप्रदक्षिणेसाठी प्रस्थान करेल. अंबाबाई मंदिरात नगरप्रदक्षिणा सोहळा रात्री साडेनऊ वाजता होणार आहे. या सोहळ्यासाठी देवस्थान समितीने जय्यत तयारी केली आहे.

या नगरप्रदक्षिणेमध्ये रात्री 11 वाजता अंबाबाई-तुळजाभवानीच्या भेटीचा संस्मरणीय सोहळा होईल. नगरप्रदक्षिणेतून तुळजाभवानी मातेचा पालखी फिरंगाईदेवी, महाकालीदेवी, अनुकामिनीदेवी, उत्तरेश्वर महादेव व गजलक्ष्मीदेवीला भेट देणार आहे. रात्री निघणाऱ्या नगरप्रदक्षिणेसाठी अंबाबाईची उत्सवमूर्ती चांदीच्या वाहनात विराजमान केली जाईल. रात्री साडेनऊ वाजता तोफेची सलामी दिल्यानंतर मंदिराच्या महाद्वाराजवळून अंबाबाई नगरप्रदक्षिणेसाठी प्रस्थान करेल.

Advertisement

यानंतर महाद्वार रोड, गुजरी, भाऊसिंगजी रोड, जुना राजवाडा या मार्गावऊन पावणेअकरा वाजता तुळजाभवानी मंदिरात अंबाबाईची उत्सवमूर्ती नेण्यात येईल. याचवेळी अंबाबाई व तुळजाभवानी मातेच्या भेटीचा सोहळा होईल. या सोहळ्यासाठी छत्रपती घराण्यातील याज्ञसेनी महाराणी, संभाजीराजे, मालोजीराजे, संयोगिताराजे, मधुरिमाराजे, शहाजीराजे व यशराजराजे उपस्थित राहणार आहेत.

या सोहळ्dयात मोतीबाग तालीमजवळील गुऊ महाराजांच्या पालखीलाही अग्रस्थान दिले जाणार आहे. 11 च्या सुमारास छत्रपती घराण्यातील सर्वांच्या साथीने अंबाबाई, तुळजाभवानी व गुऊ महाराजांची आरती करण्यात येईल. आरती सोहळ्यानंतर अंबाबाई विराजमान असलेले वाहन तुळजाभवानी मंदिरातून बाहेर आणून पुन्हा नगरप्रदक्षिणेला सुऊवात केली जाईल. हे वाहन भवानी चेंबर, गुऊ महाराज वाडा, महालक्ष्मी बँक, बिनखांबी गणेश मंदिर, महाद्वार रोड आदी मार्गावऊन पुन्हा मंदिराच्या महाद्वाराजवळ जाईल. यानंतर वाहनातील अंबाबाईची उत्सवमूर्ती सोन्याच्या पालखीत विराजमान कऊन मंदिराला प्रदक्षिणा घातली जाईल.

.

Advertisement
Tags :

.