For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

नवीन पटनायक यांच्या पक्षाकडून 9 उमेदवार घोषित

06:08 AM Mar 18, 2024 IST | Tarun Bharat Portal
नवीन पटनायक यांच्या पक्षाकडून 9 उमेदवार घोषित
Advertisement

वृत्तसंस्था/ भुवनेश्वर

Advertisement

लोकसभा निवडणुकीची घोषणा झाल्यावर राजकीय पक्षांनी आता स्वत:चे उमेदवार जाहीर करण्यास सुरुवात केली आहे. यानुसार ओडिशात बिजू जनता दलाने स्वत:च्या 9 उमेदवारांची नावे रविवारी जाहीर केली आहेत. बिजदने कालाहांडी मतदारसंघात पुष्पेंद्र सिंह देव, नवरंगपूर येथे रमेश चंद्र मांझी, बेरहमपूर येथे चंद्रशेखर साहू यांना उमेदवारी दिली आहे.

तर कोरापूट मतदारसंघात (अनुसूचित जमातींसाठी राखीव) कौसल्य हिकाका, बरगढ मतदारसंघात प्रसन्ना आचार्य, सुंदरगढ (अनुसूचित जमातींसाठी राखीव) सुनीता बिसवाल, बालंगिर येथे कलिकेश नारायण सिंह देव, कंधमालमध्ये अच्युत समंता आणि अस्का येथे प्रमिला बिसोई यांना पक्षाने उमेदवारी जाहीर केले आहे.

Advertisement

ओडिशात एकूण 21 लोकसभा मतदारसंघ आहेत. भाजप आणि बिजदमध्ये आघाडी होणार असल्याची चर्चा आहे. दोन्ही पक्षांदरम्यान आघाडी झाल्यास आगामी निवडणूक अधिकच रंगतदार ठरणार आहे. कारण बिजद राज्यात सत्तेवर असून भाजप मुख्य विरोधी पक्ष आहे.  ओडिशामध्ये लोकसभा आणि विधानसभा निवडणूक एकाचवेळी होणार आहे. राज्यात 13 मे, 20 मे, 25 मे आणि एक जून रोजी मतदान होणार आहे.

Advertisement
Tags :

.