कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

नवांकुर बालकुमार साहित्य संमेलन नाविन्यपूर्ण कार्यक्रमांनी संपन्न

04:52 PM Dec 24, 2023 IST | अनुजा कुडतरकर
Advertisement

वेंगुर्ले (वार्ताहर)-

Advertisement

जीवनात आनंदी राहण्यासाठी साहित्याची गोडी असावी लागते. मराठी साहित्य हा जगण्याचा आत्मा आहे. तेल असेपर्यंतच वात प्रकाशित असते तसेच आपण आपल्याला वाचनाची गोडी लावून घेऊन, आपण मराठी भाषा वाचवूया. रंगांचा जसा मनावर परिणाम झटकन होतो तसाच मनाला भावनेचा स्पर्श जाणवतो. मन संवेदनशील बनते. म्हणून पालकांनी मुलांशी वागताना त्यांच्या भावनांना जपणे व त्यांच्या भावना समजून घेणे महत्वाचे असते. पालकांनी मुलांना  संपत्ती देण्यापेक्षा स्वावलंबी बनवावे व आत्मविश्वास देऊन मुलांना विचारप्रवृत्त बनवा असा संदेश  नवांकूर बालकुमार मराठी साहित्य संमेलनाध्यक्ष मदन हजेरी यांनी दिला.

Advertisement

तुळस हायस्कूलच्या सभागृहात झालेल्या आनंदयात्री वाङ्मय मंडळ वेंगुर्ला आयोजित नवांकूर बालकुमार साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदावरून ते बोलत होते. व्यासपीठावर लेखिका कल्पना मलये, तुळस सरपंच रश्मी परब, सामाजिक कार्यकर्ते सचिन वालावलकर, कल्पना बांदेकर, विठ्ठल कदम, भरत गावडे, शिवाजी हायस्कूलचे मुख्याध्यापक अँन्थोनी डिसोझा,वाचनालय अध्यक्ष सगुण माळकर, कृष्णा तावडे,आनंदयात्रीच्या अध्यक्ष वृंदा कांबळी इत्यादी उपस्थित होते.

संमेलनाध्यक्ष मदन हजेरी पुढे मुलांना उद्देशून म्हणाले ," तुम्ही देणारे व्हा म्हणजेच दातृत्व हा गुण तुमच्यात येऊ दे. बोलणे व कृती सारखीच असू दे. यात विसंगती नको. वाचन संस्कृती वाढवताना त्या त्या काळातील साहित्यही वाचा. थोरांची चरित्रे वाचा.असा संदेश त्यांनी दिला. यावेळी कवी विठ्ठल कदम व भरत गावडे यांनी शुभेच्छा दिल्या. सचिन वालावलकर यांनी आनंदयात्रीचे कार्य सतत सातत्याने चालू आहे त्याबद्दल गौरवोद्गार काढले.उद्घाटन सत्राचे सूत्रसंचालन सीमा मराठे यांनी केले. प्रस्ताविक वृंदा कांबळी यांनी केले. आभार डॉ. प्रा.सचिन परूळकर यानी मानले.

दुसरे सत्र 'जाऊ कवितेच्या गावा' या कार्यक्रमात पंधरा विद्यार्थ्यानी विविध कवींच्या कविता सादर केल्या.अध्यक्षा कल्पना मलये यांनी मुलांना मार्गदर्शन केले. या सत्राचे ओघवते निवेदन वैभव खानोलकर यांनी केले. भोजनानंतरच्या सत्रात मालवणी कवी दादा मडकईकर यांनी शालेय कवितांच्या गायनाने सर्वाना मंत्रमुग्ध करून टाकले. दादांनी चालीवर गायलेल्या सुश्राव्य कवितांच्या तालावर मुलांनी टाळ्यांनी ठेका धरला आणि दादही दिली .

वृंदा कांबळी यांनी कथाकथनाचे उपयोग व परिणाम सांगितले.
समारोपाच्या सत्रात यशस्वी स्पर्धकांना पारितोषिके मान्यवरांच्या हस्ते दिली. आनंदयात्रीच्या ज्या सदस्यांनी मेहनत घेतली होती अशा महेश राऊळ, विवेक तिरोडकर, प्रतिक परूळकर, किरण राऊळ , सागर सावंत,माधव तुळसकर, गुरुदास तिरोडकर यांना पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले. आनंदयात्री चे सचिव प्रा.सचिन परूळकर यानी पिएचडी मिळविल्याबद्दल आनदयात्री वाङ्मय मंडळाकडून शाल,श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले. श्री शिवाजी हायस्कूलने साहित्य संमेलनास उत्तम सहकार्य केले त्याबद्दल पुष्पगुच्छ देऊन अँन्थोनी डिसोझा याना सन्मानित करण्यात आले. शेवटी डॉ.सचिन परुळकर यांनी सर्वांचे आभार मानले.

Advertisement
Tags :
# Tarun Bharat news update # vengurla #
Next Article