नौसेना दलाचे व्हाईस ऍडमिरल दिनेश त्रिपाठींनी घेतले आचरा श्रीदेव रामेश्वराचे दर्शन
प्राचीन मंदिर पाहून व्हाईस ऍडमिरल दिनेश त्रिपाठी गेले भारावून
आचरा | प्रतिनिधी
भारतीय नौसेना दिनानिमित्त मालवण -तारकर्ली येथे भारतीय नौसेना दलाचे उच्चाअधिकारी दाखल झाले आहेत. रविवारी सकाळी भारतीय नौसेना दलाचे उच्चाअधिकारी व्हाईस ऍडमिरल दिनेश त्रिपाठी यांनी आचरा येथील इनामदार श्रीदेव रामेश्वर मंदिराला भेट देत श्रीदेव रामेश्वर यांचे दर्शन घेतले. रामेश्वराचे प्राचीन मंदिर पाहून व्हाईस ऍडमिरल दिनेश त्रिपाठी भारावून गेलेत. यावेळी श्रीदेव रामेश्वर संस्थानच्यावतीने ट्रस्टचे अध्यक्ष मिलिंद प्रभू मिराशी यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
यावेळी त्यांच्या समवेत कॅप्टन सचिन तिर, कमांडर अभिषेक कारभारी, लेफ्टनन एस के सिंग, मंगेश दळवी, तसेच आचरा देवस्थान सचिव अशोक पडावे, कारकून शंकर देसाई, प्रकाश गुरव, कपिल गुरव, राजू घाडी, तलाठी संतोष जाधव, कोतवाल गिरीश घाडी उपस्थित होते.