For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Sangameshwar News | वैशाख वणव्यातही टिकून राहिलेली 'ती' हिरवाई; संगमेश्वरच्या रस्त्यावर प्रवाशांना पडलंय मोहिनी!

12:37 PM May 07, 2026 IST | NEETA POTDAR
sangameshwar news   वैशाख वणव्यातही टिकून राहिलेली  ती  हिरवाई  संगमेश्वरच्या रस्त्यावर प्रवाशांना पडलंय मोहिनी
Advertisement

                                       उन्हाच्या तडाख्यातही फुलला लालबुंद गुलमोहर

Advertisement

संगमेश्वर : तडाख्यातही निसर्ग आपले सौंदर्य जपतो, याची प्रचिती सध्या महामार्गालगत फुललेल्या गुलमोहर वृक्षामुळे येत आहे. तापमानाचा पारा चढलेला असताना लालबुंद फुलांनी बहरलेला हा वृक्ष प्रवाशांचे आणि वाहनचालकांचे लक्ष वेधून घेत आहे. कडक उन्हाच्यापर्यावरण संवर्धनाची जाणीव करून देणारा गुलमोहर उष्ण प्रदेशात सहज वाढणारा वृक्ष असून इंग्रजीत याला मे फ्लॉवर ट्री असे म्हणतात. मूळचा मादागास्कर येथील हा वृक्ष वैशाखातील प्रखर उन्हातही फुलतो. इतर झाडांची पानगळ होत असताना गुलमोहर मात्र हिरवाई टिकवून ठेवत परिसराला आल्हाददायक रूप देतो.

फुलांचा बहर ओसरल्यानंतर या झाडावर लांबट, चपट्या आणि तपकिरी रंगाच्या शेंगा लटकू लागतात. साधारणतः एक ते दीड फूट लांबीच्या या शेंगा झाडाच्या वैशिष्ट्यांपैकी एक आहेत.एकवेगळे सौंदर्य सध्या संगमेश्वर परिसरातील काही ठिकाणी तसेच महामार्गाच्या दुतर्फा उभ्या असलेल्या गुलमोहराच्या झाडांनी परिसराला बहाल केले आहे.

Advertisement

लाल अग्निफुलांनी नटलेला हा वृक्ष प्रवाशांना क्षणभर का होईना, पण उन्हाच्या तडाख्यातून सुखद अनुभव देत आहे. गावोगावी, रस्त्याकडेला, मोकळ्या जागांमध्ये किंवा बागांमध्ये लावण्यात येणारा गुलमोहर केवळ सौंदर्य वाढवत नाही, तर पर्यावरण संवर्धनासाठीही महत्त्वाची भूमिका बजावतो. त्यामुळे अशा वृक्षांची लागवड आणि जतन करणे काळाची गरज असल्याचे मत व्यक्त होत आहे.

Advertisement
Tags :

.