For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

ग्रीनलँडवर हल्ला झाल्यास नाटो समाप्त

06:51 AM Jan 07, 2026 IST | Tarun Bharat Portal
ग्रीनलँडवर हल्ला झाल्यास नाटो समाप्त
Advertisement

धमक्यांवर डेन्मार्कच्या पंतप्रधानांचे प्रत्युत्तर

Advertisement

वृत्तसंस्था/ ओस्लो

ग्रीनलँडवरून अमेरिकेच्या धमक्यांदरम्यान डेन्मार्कच्या पंतप्रधान मेटे फ्रेडरिक्सन यांनी अमेरिकेने अन्य नाटो देशावर हल्ला केल्यास समुहाचे अस्तित्वच समाप्त होईल असे प्रत्युत्तर दिले आहे. पंतप्रधान फ्रेडरिक्सन यांनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ग्रीनलँडवरुन केलेल्या वक्तव्यांवर कठोर टीका केली. ग्रीनलँडवरुन अमेरिकेचा दबाव कुठल्याही प्रकारे स्वीकारार्ह नाही असे त्यांनी स्पष्ट केले आहे.

Advertisement

ग्रीनलँड अमेरिकेचा हिस्सा होणार नाही. अमेरिकेचे अध्यक्ष जेव्हा ग्रीनलँडबद्दल बोलतात, तेव्हा त्याला गांभीर्याने घ्यावे लागेल, परंतु सीमांचा आदर केला जावा याबाबत पूर्ण युरोप सहमत असल्याचे फ्रेडरिक्सन म्हणाल्या.

युरोपचे डेन्मार्कला समर्थन

ग्रीनलँडवरुन ट्रम्प यांच्या वक्तव्यानंतर अनेक युरोपीय नेत्यांनी डेन्मार्कचे समर्थन केले आहे. सीमा शक्तीच्या बळावर बदलल्या जाऊ शकत नाहीत असे फ्रान्सच्या विदेश मंत्रालयाने म्हटले आहे. ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टारमर यांनी ग्रीनलँडचे भविष्य डेन्मार्क आणि ग्रीनलँडच्या लोकांनीच निश्चित करायचे असल्याचे उद्गार काढले आहेत. ग्रीनलँड डेन्मार्कचा हिस्सा आहे आणि याचमुळ तो नाटोच्या सामूहिक सुरक्षेच्या कक्षेत येतो. अमेरिकाही नाटोचा हिस्सा आहे, परंतु ट्रम्प  ग्रीनलँडला अमेरिकेत सामील करण्यावरून बोलत असल्याचे जर्मनीच्या विदेश मंत्र्यांनी म्हटले आहे.

ट्रम्प यांचे वक्तव्य

अमेरिकेला पूर्णपणे ग्रीनलँडची गरज असल्याचे ट्रम्प यांनी रविवारी म्हटले होते. तर याच्या प्रत्युत्तरादाखल डेन्मार्कच्या पंतप्रधानांनी अमेरिकेला ग्रीनलँड स्वत:मध्ये सामील करवून घेण्याचा कुठलाच अधिकार नाही आणि त्याने एका सहकाऱ्याला धमकाविणे बंद करावे असे सुनावले होते. ग्रीनलँडवर नियंत्रणाच्या प्रयत्नाचे विनाशकारी परिणाम असतील. ग्रीनलँडची तुलना व्हेनेझुएलासोबत केली जाऊ शकत नाही, कारण डेन्मार्क अशा स्थितीत नाही. डेन्मार्क नाटोचा सदस्य असून अमेरिकेची कुठलीही कारवाई कलम 5 चे उल्लंघन ठरेल असे फ्रेडरिक्सन यांनी म्हटले आहे.

Advertisement
Tags :

.