मालवणात राष्ट्रीय भूमापन दिन साजरा
मालवण | प्रतिनिधी : मालवण शहरातील उपअधिक्षक भूमि अभिलेख कार्यालय येथे राष्ट्रीय भूमापन दिन साजरा करण्यात आला. यावेळी कार्यक्रमात उप अधीक्षक भूमि अभिलेख श्री विनोद काळे, माजी नगरसेवक गणेश कुशे, शिरस्तेदार यशवंत नाईक, आनंद गांवकर व अजय मुणगेकर, मुख्यालय सहाय्यक मंगेश मालप, निमतादार गौतम कदम, परीरक्षण भूमापक श्रद्धा नाईक, अभिलेखापाल रघुवीर परब, छाननी लिपिक सचिन टिकम, भूकरमापक वैभव राजनोर दप्तरबंद मोहन तांडेल आदी अधिकारी व कर्मचारी वृंद उपस्थित होते. यावेळी भूमि अभिलेख कार्यालयाच्या वतीने भूमापन उपकरणांचे पारंपरिक पद्धतीने पूजन करण्यात आले. कार्यालयाच्या वतीने उपस्थित मान्यवरांचा स्वागत सत्कार करण्यात आला. माजी नगरसेवक गणेश कुशे यांनी अधिकारी व कर्मचारी वर्गाला राष्ट्रीय भूमापन दिनाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी उप अधीक्षक भूमि अभिलेख श्री विनोद काळे यांनी सांगितले की, १० एप्रिल रोजी भारतातील पहिली जमीन मोजणी झाली होती म्हणून आज राष्ट्रीय भूमापन दिन साजरा करण्यात येतो. जमीन मोजणीचे महत्व, जमीन मोजणीतील सुधारणा व संबंधित गोष्टींची त्यांनी थोडक्यात माहिती दिली.