ग्राहक संरक्षण कायद्याचा प्रभावी वापर करण्याचे कौशल्य आत्मसात करा!
03:36 PM Dec 24, 2023 IST | अनुजा कुडतरकर
Advertisement
मालवणात राष्ट्रीय ग्राहक दिन साजरा
Advertisement
मालवण -:
ग्राहक म्हणून आपली कुठेही फसवणूक होऊ नये आणि फसवणूक झालीच तर न्याय मिळवण्यासाठी ग्राहक संरक्षण कायद्याचा प्रभावी वापर करण्याचे कौशल्य ग्राहकांनी आत्मसात केले पाहिजे. किंमतीच्या मोबदल्यात दर्जेदार सेवा हा ग्राहकाचा हक्क असल्याचे प्रतिपादन ग्राहक तक्रार निवारण आयोगाचे माजी अध्यक्ष कमलाकांत कुबल यांनी येथे केले.
Advertisement
मालवण तहसील कार्यालय येथे पुरवठा विभागाच्या वतीने राष्ट्रीय ग्राहक दिन साजरा करण्यात आला. यावेळी पुरवठा निरीक्षण अधिकारी नागेश शिंदे, रास्त भाव धान्य दुकान अध्यक्ष अमित गावडे, उपाध्यक्ष बाळकृष्ण लुडबे, ग्राहक पंचायत मालवण शाखेचे महेंद्र पराडकर, आनंद तोंडवळकर, एस. डी. साळगावकर, केदार पराडकर, सिद्धेश मलये, विशाल ढोलम, सत्यविजय ढोलम, रोहित पेडणेकर, तुषार मालवणकर, विजय पेडणेकर आदी उपस्थित होते.
Advertisement