For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Kolhapur Politics : राष्ट्रीय काँग्रेसला खिंडार; अप्पी पाटील यांचा भाजपमध्ये प्रवेश

01:12 PM Nov 02, 2025 IST | NEETA POTDAR
kolhapur politics   राष्ट्रीय काँग्रेसला खिंडार  अप्पी पाटील यांचा भाजपमध्ये प्रवेश
Advertisement

               अप्पी पाटील यांचा भाजपमध्ये प्रवेश

Advertisement

गडहिंग्लज : उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी काँग्रेस नेते आमदार सतेज पाटील यांना धक्का दिला आहे. आमदार सतेज पाटील यांचे खंदे समर्थक, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी उपाध्यक्ष अप्पी पाटील यांनी शनिवारी कोल्हापूरमधील हॉटेल अयोध्या येथे झालेल्या कार्यक्रमात मंत्री पाटील यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला.

अप्पी पाटील यांच्या भाजप प्रवेशाने चंदगडमध्ये काँग्रेसला खिंडार पडले आहे. त्यांच्या पक्षप्रवेशाने गडहिंग्लज, चंदगड तालुक्यात खळबळ उडाली आहे. पाटील यांच्या पक्षप्रवेशाने चंदगडमध्ये स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत सर्व जागा जिंकणार असल्याचा विश्वास आमदार शिवाजीराव पाटील यांनी व्यक्त केला.चंदगड विधानसभा मतदारसंघातून अप्पी पाटील यांनी दोनदा विधानसभेची निवडणूक लढवली आहे.

Advertisement

चंदगड तालुक्यात त्यांना मानणारा मोठा गट आहे. जिल्ह्याच्या राजकारणात काँग्रेस नेते आमदार सतेज पाटील यांचे कट्टर समर्थक म्हणून त्यांची ओळख आहे. अप्पी पाटील यांच्या भाजप प्रवेशामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. पाटील यांच्यासमवेत नेसरीच्या सरपंच गिरीजा शिंदे-नेसरीकर यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला.

मंत्री पाटील म्हणाले, अप्पी पाटील यांच्यासारख्या जनसामान्यांशी नाळ जुळलेल्या कार्यकर्त्याच्या प्रवेशामुळे चंदगड मतदारसंघात पक्षाला बळकटी मिळाली आहे. भाजप हा कार्यकर्त्यांचा सन्मान करणारा पक्ष असल्यामुळे भविष्यात अप्पी पाटील यांनाही संधी मिळेल, असा विश्वास मंत्री पाटील यांनी व्यक्त केला.

अप्पी पाटील यांनी चंदगड मतदारसंघाच्या शाश्वत विकासासाठी आमदार शिवाजीराव पाटील यांची साथ देण्याचा निर्णय घेतला. कोणतीही अपेक्षा न ठेवता आपण भाजपमध्ये प्रवेश केला आहे. पुढील काळात प्रश्न सोडवण्यासाठी एकत्र काम करणार असल्याचे सांगितले. यावेळी आमदार अमल महाडिक, माजी आमदार संजय घाटगे, प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हळवणकर, संघटन

मंत्री मकरंद देशपांडे, महेश जाधव, जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील, गोकुळ संचालक अंबरीष घाटगे, अशोक चराटी, अरुण देसाई, पी. जी. शिंदे, संभाजी आरडे, डॉ. आनंद गुरव, शिवाजी बुवा, के. एस. चौगले उपस्थित होते.

भडगाव-महागाव गटातून 'शब्द'

 अप्पी पाटली यांच्या प्रवेशानंतर भडगाव-महागाव जिल्हा परिषद गटातून पूत्र श्रीशैल किंवा सोमनाथ यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे. गेल्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत तिरंगी लढतीत अप्पी पाटील गटाच्या सौ. राणी खमलेट्टी विजयी झाल्या होत्या. त्यामुळे या जागेवर त्यांना 'शब्द' दिल्याची चर्चा आहे. दरम्यान या प्रवेशाबाबत अप्पी पाटील यांच्याशी संपर्क असता मुख्यमंत्री फडणवीस यांची मुंबईत भेट घेतली असून भाजप प्रवेशावर चर्चा झाली आहे. लवकरच गडहिंग्लज येथे प्रवेशाचा कार्यक्रम आमदार शिवाजीराव पाटील यांच्या पुढाकाराने होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

कोण अप्पी पाटील

कर्नाटकात मोठे राजकीय बजन असणाऱ्या जारकीहोळी बंधूचे नातलग असणारे अप्पी पाटील गडहिंग्लज पंचायत समितीचे उपसभापती राहिले आहेत. भडगाव-महागाव गटावर कायम त्यांनी वरचष्मा ठेवला आहे. महागाव ग्रामपंचायतीच्या सत्तेत त्यांचा गट वरचढ राहिला आहे. जिल्हा बँकेचे संचालक म्हणून निवडून आल्यानंतर बँकेचे उपाध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम केले आहे. गडहिंग्लज कारखान्याचे संचालकपदही त्यांनी भूषवले आहे. आता या पदावर त्यांचे पूत्र श्रीशैल आहेत. सुरवातीस राष्ट्रवादीचे नेते, विधानसभेचे माजी अध्यक्ष बाबासाहेब कुपेकर यांचे विश्वासू कार्यकर्ते म्हणून राजकारणात ते सक्रिय झाले. २०१४, २०१९, २०२४ अशी तीनवेळा त्यांनी चंदगड मतदारसंघातून निवडणूक लढवली होती, पण त्यांना यश आले नाही.

Advertisement
Tags :

.