कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

जुने गोवेत आजपासून राष्ट्रीय कृषी परिषद

12:04 PM Nov 22, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

कृषी उत्पादन वाढीवर होणार संशोधन, मार्गदर्शन :आयसीएआरच्या 113 शाखांच्या प्रमुखांचा सहभाग

Advertisement

पणजी : गोव्यात आज प्रथमच अशी एक कृषी परिषद सुरू होत आहे, ज्यामध्ये देशातील बदलत्या हवामानात, बदलत्या वातावरणात कृषी क्षेत्रातच सुधारणा करून आर्थिकदृष्ट्या परवडणाऱ्या पिकावळीची लागवड करणे, याबाबत संशोधन व मार्गदर्शन केले जाणार आहे. देशातील भारतीय कृषी संशोधनाच्या 113 शाखांचे प्रमुख तसेच भारताचे आयसीआरचे महासंचालक डॉ. हिमांशू पाठक हे स्वत: या परिषदेमध्ये सहभागी होणार आहेत. ही परिषद जुने गोवे येथील सेंट जोसेफ वाझ स्पिरीच्युअल रिनिव्हल सेंटर येथे आजपासून सलग तीन दिवस चालणार आहे. गोव्याचे राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई परिषदेचे उद्घाटन करणार आहेत.

Advertisement

 देशातील 113 संशोधन केंद्रांचा सहभाग

बदलत्या हवामानामुळे आपल्या विविध कृषी उत्पादनांवर सध्या विपरित परिणाम होतो आणि त्याचा परिणाम म्हणून शेतकरीवर्ग संकटात सापडलेला आहे. कोणत्याही वातावरणाला टक्कर देण्यासाठी अत्याधुनिक कृषी यंत्रणा कशी निर्माण करता येईल, याबाबत अनेक कृषी संशोधक या परिषदेत प्रबंध मांडणार आहेत. देशातील आयसीएआरच्या 113 केंद्रामध्ये जे काही संशोधन वेगवेगळ्या पातळीवर चालत आहे, त्यावरही साधकबाधक चर्चा या तीन दिवसांच्या परिषदेत होणार आहे.

 अनेक मान्यवर तज्ञांची उपस्थिती

भारतीय कृषी संशोधन संस्थेचे महासंचालक तसेच कृषी क्षेत्राचे महासचिव डॉ. हिमांशू पाठक, नवी दिल्ली आयसीआर उपसंचालक डॉ. एस. के. चौधरी तसेच राणी लक्ष्मीबाई कृषी विद्यापीठ झाँसीचे कुलगुरु पद्मश्री डॉ. अरविंद कुमार आणि यजमान गोवाच्या आयसीआरचे संचालक डॉ. प्रवीण कुमार हे या परिषदेत काही महत्त्वाचे विषय मांडणार आहेत.

 गोव्यातील कृषी उत्पादनावर विशेष कार्यशाळा

गोव्यातील कृषी उत्पादन आणि सद्यस्थिती आणि त्यातून दुप्पट उत्पन्न कसे मिळविता येईल, या विषयावरही विशेष कार्यशाळा या परिषदेत होणार आहे. संपूर्ण देशभरातील 550 प्रतिनिधी संशोधक व मार्गदर्शक या तीन दिवसीय परिषदेत सहभागी होत आहेत. यंदाची ही 22 परिषद असून ती प्रथमच गोव्यात होत आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article