For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

नाटे घरफोडी; कोल्हापुरातून दोघे ताब्यात

08:04 AM Jul 30, 2026 IST | Tarun Bharat Portal
नाटे घरफोडी  कोल्हापुरातून दोघे ताब्यात
Advertisement

  रत्नागिरी ‘एलसीबी’ची कारवाई :  2 लाख 66 हजारांचा मुद्देमालही जप्त :  संशयित सांगली, कर्नाटकातील

Advertisement

त. भा. प्रतिनिधी

रत्नागिरी :

Advertisement

राजापूर तालुक्यातील नाटे येथील बंद घराचे कुलूप तोडून लाखांचा मुद्देमाल लांबवणाऱ्या सराईत चोरट्यांचा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने पर्दाफाश केला आहे. अत्यंत तांत्रिक आणि गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी थेट कोल्हापूर जिल्ह्यातील हुपरी येथून दोन अट्टल चोरट्यांना बेड्या ठोकल्या आहेत. या धडक कारवाईत पोलिसांनी आरोपींकडून चोरीस गेलेले सोन्या-चांदीचे दागिने आणि गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल असा एकूण 2 लाख 66 हजार ऊपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

ही घरफोडी 4 ते 5 मार्चदरम्यान घडली होती. नाटे येथील ‘यश होम स्टे’च्या पाठीमागे राहणारे प्रोजेक्ट सुपरवायझर रोशन मोठाभाऊ बच्छाव (मूळ रा. मालेगाव, नाशिक) कामाच्या निमित्ताने बाहेर गेले होते. घर बंद असण्याचा फायदा घेत चोरट्यांनी मुख्य दरवाजाचे कुलूप तोडले आणि बॅगेत ठेवलेले सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम असा तब्बल 2 लाख 91 हजार ऊपयांचा ऐवज लांबवला होता. याप्रकरणी नाटे पोलीस ठाण्यात भारतीय न्यायसंहिता अधिनियम 2023 चे कलम 305(अ), 331(3)(4) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

   ‘एलसीबी’ ची कोल्हापुरात धाड

गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे आणि अपर पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी यांनी तात्काळ तपासाची चक्रे फिरवली. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गोपनीय बातमीदार आणि तांत्रिक तपासाच्या आधारे मंगळवार 28 जुलै रोजी हुपरी (जि. कोल्हापूर) येथून विकास टीपू पवार (23, मूळ रा. जत, जि. सांगली) आणि संपत बिल्लू पवार (20, मूळ रा. विजापूर, कर्नाटक) या दोघांना ताब्यात घेतले. पोलिसी कचाट्यात सापडताच त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली.

आरोपींच्या ताब्यातून पोलिसांनी 1 लाख 91 हजार ऊपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने आणि गुन्ह्यासाठी वापरलेली मोटारसायकल असा एकूण 2 लाख 66 हजार ऊपयांचा ऐवज जप्त केला आहे. पुढील कायदेशीर कारवाईसाठी दोन्ही आरोपी आणि जप्त ऐवज नाटे पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आला आहे. ही कामगिरी एलसीबीचे पोलीस निरीक्षक नितीन ढेरे यांच्या सूचनेनुसार श्रेणी पोलीस उपनिरीक्षक संदीप ओगले, हवालदार विजय आंबेकर, दीपराज पाटील, योगेश नार्वेकर आणि चालक अतुल कांबळे यांनी पार पाडली.

Advertisement
Tags :

.